Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनThe Big Bull : इस देश मैं हम कुछ भी कर सकते...

The Big Bull : इस देश मैं हम कुछ भी कर सकते है…

मुंबई | Mumbai

अभिनेता अभिषेक बच्चन आणि इलियाना डिक्रूझचा आगामी चित्रपट ‘द बिग बुल’ गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटाचा

- Advertisement -

ट्रेलर रिलीज झाला असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या चित्रपटात अभिषेक मुख्य भूमिकेत दिसणार असून १९९२ मध्ये भारतीय शेअर बाजारात झालेल्या मोठ्या स्कॅममधील आरोपी हर्षद महेता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे.

या चित्रपटातील अभिषेक बच्चनचा लूक आणि स्टाईल चाहत्यांना खूपच आवडली आहे. त्याचबरोबर यात इलियाना डिक्रूझ पत्रकाराच्या भूमिकेत शोभून दिसत आहे. ‘द बिग बुल’ च्या ट्रेलरमध्ये चाहत्यांना पुन्हा एकदा अभिषेक बच्चनचा स्वॅग आवडला आहे.

तर दुसरीकडे ट्रेलरमध्ये बरेच दमदार संवाद ऐकायला मिळत आहेत. यासह चित्रपटातील अभिषेक आणि इलियानाची केमिस्ट्रीही चाहत्यांना भावली आहे. चित्रपट अजय देवगण आणि आनंद पंडित प्रड्यूस करत असून कुकी गुलाटी हे दिग्दर्शन करत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या