२८ दिवसांनी अभिषेकची करोनावर मात

अभिषेकने ट्विट करत दिली माहिती
अभिषेक बच्चन
अभिषेक बच्चनअभिनेता

मुंबई

बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन याची करोना चाचणी तब्बल २८ दिवसानंतर निगेटिव्ह आली आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याला रुग्णालायतून डिस्चार्ज देण्यात आला आहे. अभिषेकने ट्विट करत ही माहिती दिली आहे.

बच्चनने यांनी ट्विटमध्ये लिहिले की, 'प्रॉमिस हे प्रॉमिस असते. आज दुपारी माझी कोविड-१९ टेस्ट निगेटिव्ह आली. मी तुम्हाला म्हणालो होतो ना की, मी याला हरवेल. माझ्या आणि माझ्या कुटुंबासाठी तुम्ही प्रार्थना केली याचे खूप आभार. नानावटी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफचे खूप खूप धन्यवाद'

११ जुलैच्या संध्याकाळी अभिषेक व अमिताभ बच्चन यांना लक्षण दिसल्यानंतर रुग्णालयात गेले होते. अभिषेकने करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची बातमी ट्विटरवर दिली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com