Thursday, April 25, 2024
HomeमनोरंजनFake News विरोधात बिग बींच्या नातीची दिल्ली हायकोर्टात धाव; YouTube, Google ला...

Fake News विरोधात बिग बींच्या नातीची दिल्ली हायकोर्टात धाव; YouTube, Google ला बजावलं समन्स

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची नात तसेच अभिषेक-ऐश्वर्या बच्चन यांची मुलगी आराध्या (Aradhya Bachchan) संबंधी याचिकेवर दिल्ली हायकोर्टाने (Delhi Highcourt) महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. सध्या आराध्या चर्चेत आली आहे ते तिने दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेमुळे…

- Advertisement -

राहुल गांधींना झटका; सुरत न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली

युट्यूब चॅनलवर आराध्याच्या तब्येतीची चुकीची माहिती दिल्याच्या विरोधात आराध्याने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. जस्टिस सी हरि शंकर यांच्या पीठाने आराध्या बच्चन हिच्यासंबंधी वेगवेगळ्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून सुरु असलेल्या खोट्या बातम्या काढण्याचे निर्देश दिले आहेत. यापुढेही अशा प्रकारच्या खोट्या बातम्या शेअर केल्या जाऊ नयेत, असं कोर्टाने म्हटलंय. याचिकेत गूगल (Google) आणि यूट्यूबला पक्षकार बनवण्यात आलं होतं. या दोन्ही कंपन्यांना कोर्टाने समन्स जारी केले आहे.

गौतम अदानींनी घेतली शरद पवारांची भेट; तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा?

दरम्यान, या प्रकरणाबद्दल बोलताना आराध्याने सांगितलं की, काही युट्यूब (Youtube)आणि वेबसाईटवरून आराध्याच्या प्रकृतीबाबत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. आराध्याच्या तब्येतीविषयी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच अशा युट्यूब चॅनेलवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलीय. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

आराध्या १२ वर्षांची असून बच्चन कुटुंबाचा जीव आहे. आई ऐश्वर्या व्यतिरिक्त आराध्याचे तिचे आजोबा म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्यासोबतही खास बॉन्डिंग आहे. आराध्या नीता अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्यादरम्यान ट्रोल झाली होती. तिची हेअर स्टाईल गेली अनेक वर्ष तशीच आहे, असे म्हणत नेटकऱ्यांनी तिच्यावर निशाणा साधला होता.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या