मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आणि किरण राव यांचा घटस्फोट

१५ वर्षांचे नाते संपुष्टात

मुंबई | Mumbai

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) यांनी घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं. (Aamir Khan and Kiran Rao announce divorce after 15 years of marriage)

१५ वर्षांच्या संसारानंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून स्वत: आमिर खानने घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक निवेदन जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.

जाहीर केलेल्या निवेदनात म्हंटल आहे की “गेल्या १५ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर आम्ही घटस्फोट घेत आहे. आम्हाला आमच्या आयुष्यातील नव्या अध्यायाची सुरुवात करायची आहे. त्यामध्ये आम्ही पती-पत्नी नव्हे तर पालक आणि एकमेकांसाठी कुटुंबातील एक सदस्य असू.” मात्र आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटामागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही.

आमीरचं हे दुसरं लग्न होतं. याआधी आमिरने रीना दत्ता यांच्याशी १९८६ मध्ये लग्न केलं. त्या दोघांनी २००२ साली विभक्त होण्याचा निर्णय घेतला. जुनैद खान आणि इरा खान ही या जोडप्याची दोन मुलं आहेत. आमिर आणि किरण यांचं २००५ मध्ये लग्न झालं होतं. आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान चित्रपटावेळी आमिर आणि किरण यांची पहिल्यांदा भेट झाली. किरण त्या चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिका होत्या.

किरण यांनी धोबीघाट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. जाने तू जाने ना, पीपली लाईव्ह, धोबीघाट, दिल्ली बेल्ली, तलाश, दंगल, सिक्रेट सुपरस्टार, रुबरू रोशनी या चित्रपटांच्या त्या निर्मात्याही होत्या. तसेच आमीर आणि किरण हे पानी फाऊंडेशनच्या विविध कार्यक्रमांमध्ये नियमितपणे सहभागी व्हायचे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com