Thursday, April 25, 2024
Homeमनोरंजन'वेडात मराठे वीर दौडले सात' चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात!

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान मोठा अपघात!

कोल्हापूर | Kholapur

दिग्दर्शक महेश मांजरेकर (mahesh manjrekar) यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ( (Vedat Marathe Veer Daudle Saat) ) या ‘बिग बजेट’ ऐतिहासिक चित्रपटाची काही महिन्यांपूर्वी घोषणा झाली.

- Advertisement -

या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता अक्षय कुमार दिसणार आहे. तर प्रवीण तरडे, हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, नवाब शहा हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.

अमृता फडणवीसांना १ कोटी लाचेची ऑफर देणारी ‘अनिक्षा’ कोण?

दरम्यान या चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी एक मोठा अपघात झाला आहे. कोल्हापूरमधील पन्हाळगडावर हा अपघात झाला आहे. चित्रपटाचे शूटिंग संपल्यानंतर फोटोग्राफी करताना किल्ले पन्हाळगडावरील सज्जा कोठीवरून एक तरुण दरीत पडला आहे.

शनिवारी १८ मार्च रोजी रात्री ९.१५ च्या सुमारास ही घटना घडली. या तरुणावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ज्या तरुणाचा हा अपघात झाला आहे. या अपघातामुळे महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हा चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे.

कडाक्याची थंडी…आसपास कोणीही नाही अन् तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या…मग…

चित्रपटाची घोषणा झाल्यापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला होता. आधी या चित्रपटातील सात मावळ्यांचे पोशाख आणि त्यांना दिलेले रूप यावरून बोलले गेले. मग महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्य मांजरेकर मावळा वाटतो का, यावरूनही खूप टीका केली गेली. आता या अपघातामुळे पुन्हा एकदा हा चित्रपट चर्चेत आला आहे.

सत्या मांजरेकरांना वगळले?

चित्रपटात हार्दिक जोशी, विशाल निकम, जय दुधाणे, डॉ. उत्कर्ष शिंदे, प्रवीण तरडे हे कलाकार या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तर, महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजरेकरदेखील चित्रपटातील लूक रिव्हील करण्यात आला होता. पण आता या चित्रपटाबद्दल एक महत्त्वाची बाब समोर येत आहे.

गोदावरीत चार तरुण बुडाले; एकाचा मृतदेह हाती, तिघांचा शोध सुरु

महेश मांजरेकर यांनी त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरला या चित्रपटातून काढून टाकल्याची चर्चा रंगली आहे. शिवप्रेमींनी सत्या मांजरेकरच्या निवडीवर आक्षेप नोंदवला होता. त्याच्यावर सडकून टीका झाली होती. सत्या मांजरेकर छत्रपतींचा मावळा म्हणून शोभत नाही त्याला ही भूमिका देऊ नये, अशा शब्दांत अनेकांनी टीका केली होती. या विरोधामुळे महेश मांजरेकर यांनी आपल्या मुलाला या भूमिकेतून काढून टाकल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या