नोटबंदीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली; माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची टिका

0

नवी दिल्ली |  अर्थतज्ञ तथा देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आज गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी नोटबंदीचा फटका देशवासियांना बसला असून यामुळे देशातली अर्थव्यवस्था कोलमडली असून अनेक वर्षे भारत विकासाच्या दृष्टीने मागे राहिल्याची टीका त्यांनी केली.  ते आज अहमदाबाद येथील शाहीबाग परिसरातील सरदार स्मारक येथे झालेल्या सभेत ते संबोधित करत होते. 

सिंग यावेळी म्हणाले की, नोटबंदीचा फटका अर्थव्यवस्थेवर झाला असून प्रत्येक एका टक्क्याची किंमत १.५ कोटी रुपये आहे.

याचा अर्थ असा होती की देशात विकास खुंटल्यामुळे अनेकांची नोकरी गेली. अनेक शिक्षित तरुण बेरोजगार झाले. अनेक उद्योग बंद झाले.

असे होऊनसुधा मोदी सरकार यातून काही शिकले ही मोठी शोकांतिका आहे. यामुळे शेतकरी, लहान व्यावसायिक, व्यापारी मोठ्या संकटात सापडेल आहेत.

त्यानंतर लगेचच कुठलाही आराखडा न आखता मोदी सरकाने जीएसटी चुकीच्या पद्धतीने लागू केला. त्यांचा अजूनही तोटा अनेकांना सहन करावा लागत आहे.

गुजरातमध्ये सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. भाजपा आणि काँग्रेसकडून निवडणुकीसाठी जोरदार प्रचार केला जातो आहे. गुजरात निवडणुकीसाठी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासह पक्षाचे बडे नेते जोरदार प्रचार  करत आहेत.

या पार्श्वभूमीवर आता देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग काँग्रेसचा प्रचार करत आहेत. गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील काँग्रेसच्या प्रचारात नोटाबंदी आणि जीएसटीचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आलेला आहे.

आज मनमोहन सिंग एका दिवसाच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. आजच्या या दौऱ्यामध्ये मनमोहन सिंग तेथील व्यापाऱ्यांशी जीएसटीच्या मुद्द्यावर देखील चर्चा करणार आहेत.

LEAVE A REPLY

*