Type to search

मनमाड : करंजवन- मनमाड पाणीपुरवठा योजनेस मंजुरी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : करंजवन- मनमाड पाणीपुरवठा योजनेस मंजुरी; मुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील

Share

नाशिक : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या करंजवन-मनमाड पाणीपुरवठा योजनेस अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंजुरी दिली असून लवकरच मनमाडकरांचा पाणी प्रश्न मार्गी लागणार आहे.

आज झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीष महाजन आणि दिंडोरी मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.

गेल्या अनेक वर्षापासून निर्माण झालेल्या पाणी प्रश्‍न दिवसेंदिवस अधिक तीव्र होत आहे. मनमाडकरांचा हा प्रश्न सुटला असून करंजवन- मनमाड योजनेस मंजुरी मिळाली असून गेल्या पाच दिवसांपूर्वीच मनमाड येथे स्थानिक डॉक्टरांनी या योजनेला तात्काळ मंजुरी देण्यात यावी आंदोलन केले होते.

आम्ही मनमाडकर या बॅनरखाली शहरातील पाच नागरिकांनी उपोषणही केले होते. यावेळी आश्वासनानं नंतर उपोषण मागे घेण्यात आले होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!