Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : शहरात खड्डे बुजविण्यास सुरवात; देशदूतच्या बातमीची दखल..

Share

मनमाड : पावसाच्या रिपरिपमुळे मनमाड शहर शहरातील जवळपास सर्वच कॉक्रिट आणि डांबरी रस्ते खड्डेमय होऊन त्यांची अक्षरशःचाळण झाली आहे. पावसाच्या रीपरीपीमुळे या खड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही. त्यामुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी देखील झाले आहेत.

रस्त्यावर इतके खड्डे झालेले आहेत कि त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत असल्याची बातमी दै.देशदूत मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका प्रशासनाने याची दखल घेवून मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येत आहे. दै.देशदूत ने आवाज उठविल्यामुळेच पालिका प्रशासन खबडून जागे झाल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.

दरम्यान शासनाने शहरातील रस्त्यासाठी निधी दिला असून लवकरच काही रस्ते कॉक्रिटचे तर काही डांबरी केले जाणार असल्याची माहिती मुख्यधिकारी डॉ,दिलीप मेणकर यांनी दिली

पावसाळा सुरु होण्या अगोदर अनेक रस्त्यावर छोटे-मोठे खड्डे झालेले होते गेल्या काही दिवसा पासून पावसाची रिपरिप सुरु आहे होती या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली विशेषता शहरातील हुडको, शिवाजी नगर, हनुमान नगर, कीर्ती नगर, कम्प, दत्तमंदिर रोड, आंबेडकर चौक, स्टेशन रोड, पाकिजा चौफुली, आठवडे बाजार, कॉलेज रोड, उस्मानिया चौक, शिवाजी चौक, बोहरी कंपाऊंड यासह शहरातील जवळपास सर्वच भागातील सिमेंट व डांबरी रस्त्यांची इतकी दुर्दशा झालेली आहे त्याच्यावरून पायी चालणे कठीण झाले आहे.

बातमी दै.देशदूत मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर पालिका प्रशासन खडबडून जागे झाले व नगराध्यक्षा पद्मावती धात्रक, मुख्याधिकारी डॉ.दिलीप मेणकर यांनी तातडीने खड्डे बुजविण्याचा आदेश दिला त्यानुसार सध्या मुरूम टाकून खड्डे बुजविण्यात येत आहे.

शासनाने रोड ग्रैंड मंजूर केली असून निधी देखील प्राप्त झालेला आहे त्यामुळे लवकरच काही रस्ते कॉक्रिटचे तर काही डांबरी केले जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी डॉ. मेणकर यांनी दिली

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!