Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : खासदार भारती पवार यांच्या मध्यस्थीने डॉक्टरांच्या उपोषणाला स्थगिती

Share

मनमाड । प्रतिनिधी : पाणी पुरवठा योजना तातडीने मंजूर करावी यासाठी ‘आम्ही मनमाडकर’च्या बैनरखाली पाच नागरिकांनी आमरण उपोषण सुरु केले होते. यावेळी आज (दि. ०५) नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि नवनियुक्त खासदार डॉ. भारती पवार यांच्या मध्यस्थीने या उपोषण मागे घेण्यात आले.

पाणी द्या, अन्यथा शहर सोडू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. दरम्यान या उपोषण करणाऱ्यामध्ये ०३ डॉक्टर व ०२ समाज सेवकांचा समावेश होता. पाण्यासाठी होत असलेल्या या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सोबत सर्वसामान्य नागरिकांनी उस्फुर्तपणे पाठींबा दिला होता. मनमाड पाणी प्रश्न कायम स्वरुपी सुटावा या करिता करंजवन योजनेस प्रशासकीय मंजुरी मिळावी या करिता आमरण उपोषण केले होते.

दरम्यान यावेळी आलेल्या महाजन तसेच खासदार भारती पवार यांनी लेखी स्वरूपात पत्र दिले की येत्या ११ तारखेला मुंबई येथे बैठक घेऊन यावर तात्काळ तोडगा काढण्यात येईल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!