मनमाडला हाणामारी ; ११ जणांवर गुन्हे दाखल

0
नाशिक  (प्रतिनिधी) : येथून जवळ असलेल्या नागापूर येथे अंतर्गत वादातून एका महिलेला मारहाण केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी ११ जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सत्ताधारी पक्षातील माजी आमदार पुत्रदेखील यात असल्याचे समजते.

हाणामारीत एक महिला जखमी झाली असून या महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दरम्यान,  6 जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती येथील पोलीस निरीक्षक पुंडलिक सपकाळे यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मनमाड पासून 4 किमी अंतरावर असलेल्या नागापूर येथे बेबीबाई पवार व सूरज पवार यांच्यात वाद झाले. वादाचे पर्यावसान हाणामारीत झाल्याने बेबीबाई पवार या हाणामारीत जखमी झाल्याचे समजते.

त्यांनी दिलेल्या तक्रारी वरून सूरज पवार याच्यासह इतर 11 जणाविरुद्ध विविध कालमानव्ये गुन्हा दाखल करून 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*