Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : जोंधळवाडी शिवारातील अपघातात एक ठार तर दोन जण गंभीर

Share

मनमाड : मनमाड पासून जवळ असलेल्या जोंधळवाडी शिवारात टाटा मॅजिकने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक जण ठार तर दोन जण गंभीर झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान जखमींवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनमाड नांदगांव रस्त्यावरील जोंधळवाडी फाट्यावर आज दुपारी किरण साहेबराव महाले (वय २६), वैभव लवांड (वय १५), दशरथ लवांड (वय ४५,सर्व रा वणी पाडाणे, ता दिंडोरी) हे तिघे जण एम.एच-१५, ई.एल-०५५७ या मोटारसायकल वरून नांदगावकडे जात असतान समोरून येणाऱ्या एमएच-४१,एजी-२२८३ या टाटा मॅजिकने दिली.या अपघाता किरण महाले याचा मृत्यू झाला तर वैभव लवांड, दशरथ लवांड हे दोघे गंभीर जखमी झाले आहे.

पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेऊन त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या सर्वच रस्ते खड्डेमय झाले असल्याने त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. खड्डा चुकविण्याच्या नादात रोज अपघात होऊन त्यात निरपराधांचा बळी जात असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!