Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

‘पंचवटी’ला तासभर उशीर; जागा मिळत नसल्याने पासधारक महिलांनी चेन खेचली

Share

नाशिक | प्रतिनिधी 

नाशिक-मुंबई दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामध्ये पुरुषांसह महिला पासधाराकांचीही संख्या वाढली आहे. पासधारक महिलांसाठी विशेष बोगी नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी नाशिक ते देवळाली कॅम्प परिसरात पाच ते सहा वेळेत चेन खेचून आंदोलन केले. दरम्यान, हा प्रकार रेल्वे पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ रेल्वेत प्रवेश करून महिलांची समजूत काढली त्यानंतर रेल्वे मार्गस्थ झाली. महिला पासधारकांना आरक्षण देऊन हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी महिला पासधारकांकडून केली जात आहे.

परंतु, १५-२० महिलांनी चेन खेचल्याचा त्रास पंचवटी एक्स्प्रेसमधील सर्वच प्रवाशांना झाला. आज मुंबई ट्रेन जवळपास एक तास उशिराने पोहोचली. यामुळे जवळपास सर्वच प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, महिलांचे काय प्रश्न आहेत हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता. असे समजले की, दररोज नाशिकहून मुंबईसाठी २५-३० महिला ये-जा करतात.  पुरुषांना जशी पासधारकांची विशेष बोगी देण्यात आली आहे. तशीच महिलांना मिळावी अशी महिलांची मागणी आहे.

रेल्वेकडे गेल्या अनेक दिवसांपासून महिलांनी मागणी लावून धरली असून या मागणीची दखल घेत रेल्वेने गेल्या १५ ते २० दिवसांपूर्वी महिला पासधारकांचे सर्वेक्षण केले होते.

रेल्वेचे दोन कर्मचारी महिला पासधारकांचे प्रश्न जाणून घेत होते. मात्र, सरासरी ३१ महिला पासधारक असल्याचे समजले. तद्नंतर रेल्वेने अवघ्या ३१ महिलांना विशेष बोगी देता येणार नसल्याचे सांगितले. यामुळे महिलांमध्ये नाराजी आहे.

जर पुरुषांच्या बोगीत महिलांना जागा करून दिली तर शक्य आहे का? पासधारक पुरुषांची याठिकाणी दादागिरी असते, ते या महिलांना एकाच बोगीत सामावून घेणार नाहीत असे एका ज्येष्ठ व्यक्तीने सांगितले.

 

महिला पासधारकांसाठी आरक्षण हवे

महिलांना नाशिक मुंबई प्रवास करण्यासाठी मोठा त्रास होतो. पुरुष पासधारकांच्या बोगीत महिला बसू शकत नाहीत, याला काही वेगळी कारणे आहेत.  शुक्रवारी सायंकाळी आणि सोमवारी सकाळी इतकी गर्दी असते की, उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाहीत. मनमाडहून येणारी गाडी आधीच भरलेली असते.

अनेकजण खिडकीतून रुमाल टाकून जागा अडवून बसतात. उभे तर उभे गाडी मिळावी, यासाठी महिला मोठा संघर्षच करत असतात. त्यामुळे नियमित पासधारक महिलांना रेल्वेने आरक्षण देत ठराविक जागा द्यावी.

आरती माळी, पासधारक महिला

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!