Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड शहरातील कॉक्रिट आणि डांबरी रस्त्यांची चाळण

Share

मनमाड : गेल्या काही दिवसा पासून मनमाड शहर परिसरात पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू असून पावसामुळे शहरातील जवळपास सर्वच कॉक्रिट आणि डांबरी रस्ते खड्डेमय होऊन त्यांची अक्षरशःचाळण झाली आहे.

पावसाच्या रीपरीपीमुळे या खड्यात पाणी साचत असल्याने वाहन चालकांना त्याचा अंदाज येत नाही त्यामुळे रोज अपघात होऊन अनेक जण जखमी देखील झाले आहेत. रस्त्यावर इतके खड्डे झालेले आहेत कि त्यावरून पायी चालणे देखील कठीण झाले असल्याने नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.

जुन्या रस्त्या बरोबरच लाखो रुपये खर्च करून काही महिन्या पूर्वी तयार करण्यात आलेल्या रस्त्यांची देखील अशीच अवस्था झाली असून जर हलक्याफुलक्या पावसामुळे रस्त्यांची ही अवस्था झालेली आहे तर जोरदार पाऊस झाल्यास काय होईल असा प्रश्न नागरिकांना पडला असून रस्त्यांची अवस्था पाहता त्याची कामे नित्कृष्ठ दर्ज्याची झाल्याचे दिसून येत असल्याने सर्वात जास्त भ्रष्ट्राचार हा रस्त्यांच्या कामात झाला असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

रस्त्यांच्या कामांची सखोल चौकशी करण्यात यावी आणि ज्या ठेकेदारांनी नित्कृष्ठ दर्ज्याचे काम केले आहे त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!