Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मनमाड : धावत्या ट्रेन्स मध्ये प्रवाशांना लुटणारी टोळी जेरबंद

Share

मनमाड : धावत्या ट्रेन्स मध्ये प्रवाशांना लुटणाऱ्या ६ जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात मनमाड रेल्वे पोलिस आरपीएफला यश आले असून पकडण्यात आलेले सर्व आरोपी हे तामिळनाडू भागातील आहे.

या टोळीने दिल्ली-गोवा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात एका महिलेची बैग चोरून पसार झाले होते. रेल्वे पोलिसांनी सापळा रचून या टोळीला मनमाडच्या तिकीट बुकिंग कार्यलया जवळ अटक करून मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी सर्व आरोपी विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते कोर्टाने या आरोपींना १६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षक एन.के.मदने यांनी दिली. सदर आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी कोणकोणत्या ठिकाणी प्रवाशांना लुटले याचा पोलीस तपास करीत असल्याचे त्यांनी सांगितले

या बाबत पोलीस निरीक्षक मदने यांनी पत्रकारांना माहिती देतांना म्हणाले कि जम्मूतावी-गोवा झेलम एक्स्प्रेस च्या वातानुकूलित डब्यातून पवनकुमार कामरा हे पत्नी कोमल सोबत प्रवास करीत होते.गाडी मनमाड रेल्वे स्थानकावर थांबल्या नंतर त्यांच्या पत्नी दारात उभ्या असताना तुमचे पैसे खाली पडले असे सांगून त्यांचे लक्ष विचलित करून त्यांच्या हातात असलेली पर्स हिसकावून पसार झाले होते.

पर्स मध्ये ४० हजार रुपये रोख रकमेसह मोबाईल व इतर साहित्य होते. कामरा दाम्पत्यांनी या बाबत रेल्वे पोलीसाकडे तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली सर्वात प्रथम रेल्वे स्थानकावर असलेली सीसीटीव्हीतील फुटेज तपासण्यात आला असता त्यांना तिकटी बुकिंग कार्यलया जवळ काही संशयित आढळून आले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेवून विचार पूस केली मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांची झडती घेण्यात आल्यावर त्यांच्याकडे चोरी करण्यात आलेली पर्स मिळाली पोलिसांनी खाक्या दाखविताच झेलम एक्स्प्रेस मधून महिलेची चोरलेली पर्स असल्याची कबुली आरोपींनी दिली.या पर्स मध्ये ४० हजार रुपये रोख रकमेसह मोबाईल आणि इतर महत्वाची कागदपत्रे होती.

राजा अरमुगम, सुब्रमणियम सरवाई, सत्यासेलन महेंद्रन, कुमारसेन सेल्वराज, मूर्ति सरवाई, मदनकुमार सरवाई अशी या आरोपींची नावे असून सर्व तामिळनाडू भागातील आहेत त्यांच्या विरुद्ध दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांनी आणखी काही कोणत्या ठिकाणी चोरी केली याचा तपास करीत असल्याचे पो.नी.मदने यांनी सांगितले

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!