मनमाडमध्ये मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ; १० जणांना चावा

0
मनमाड | मनमाडपासून जवळ असलेल्या रापली येथे आणि शहर परिसरात मोकाट कुत्र्यानी आज धुमाकूळ घालत सुमारे 10 जणांना चावा घेतल्याची घटना घडली आहे.

काहींचे तर कुत्र्यांनी अक्षरशः लचके तोडल्याने एकच खळबळ उडून भीती पसरली आहे. कुत्र्यांनी चावा घेतलेल्या पैकीत काहींना गंभीर दुखापत झाली असून 6 जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेतील गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मोकाट कुत्र्याचं पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

LEAVE A REPLY

*