कंगनाचा ‘मणिकर्णिका’ पाहून अनुपम खेर म्हणाले…

0
मुंबई : चित्रपट ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी’ रिलीज झाल्‍यानंतर कंगना राणावतने एका मुलाखतीत आपले मत, प्रतिक्रिया व्‍यक्‍त केल्‍या आहेत. नाराजी व्‍यक्‍त करत तिने चित्रपट इंडस्ट्रीमध्‍ये तिचे चित्रपट दाबण्‍याचा प्रयत्‍न होत आहे. बॉलिवूडमध्‍ये तिला कुणी सपोर्ट करत नाही, अशी टिका कंगनाने केली होती.

आता अभिनेता अनुपम खेरने कंगनाच्या या चित्रपटाचे आणि तिच्या अभिनयाचे कौतुक केले आहे. कंगना रॉकस्टार आहे. ती अत्यंत हुशार आणि धाडसी अभिनेत्री आहे. मी तिच्या धैर्याचे आणि कामगिरीचे खरंच कौतुक करतो. महिला सबलीकरणाचं ती एक उत्तम उदाहरण आहे, असे म्हणत खेर यांनी कंगनाच्या या चित्रपटाची आणि अभिनयाची प्रशंसा केली आहे.

कंगनाने म्‍हटले होते, ‘सर्वजण मिळून माझ्‍याविरोधात काम करत आहेत.’ आणखी एका मुलाखतीत तिने आलिया भट्टविरोधात नाराजीही व्‍यक्‍त केली. कारण आलिया, ‘मणिकर्णिका’च्‍या सर्थनार्थ काहीच म्‍हणाली नाही. आता, या सर्व गोष्‍टींनंतर अनुपम खेर यांनी आपल्‍या ट्विटर अकाउंटवर प्रश्‍न-उत्तरांचे एक सेशन ठेवले होते. त्‍यांच्‍या एका फॉलोअरने कंगनाच्‍या समर्थनार्थ ट्‍विट करण्‍यास सांगितले. एक युजर म्‍हणाला, ‘बॉलिवूडमध्‍ये कुणीही कंगनाचा चित्रपट ‘मणिकर्णिका’ला सपोर्ट करत नाही. आपण, तिच्‍या सपोर्टमध्‍ये ट्‍विट कराल?’

चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अनेकांनी चित्रपटाचे आणि माझ्या अभिनयाचे कौतुक केले. मात्र, एकही बॉलिवूड कलाकार माझ्या आनंदात सहभागी झाला नाही याची खंत व्यक्त करत कंगनाने आमिर खान आणि आलिया भट्टवरही निशाणा साधला. त्यानंतर आता खेर यांनी चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून कंगनाने दिग्दर्शनात पदार्पण केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर ८५.८० कोटींची कमाई केली आहे.

LEAVE A REPLY

*