माणी आश्रमशाळा विषबाधा प्रकरण : विद्यार्थिनींच्या प्रकृतीत सुधारणा

0
नाशिक । दुपारच्या जेवणातील खिचडीमुळे विषबाधा झालेल्या माणी (ता. सुरगाणा) येथील शासकीय आदिवासी मुलींच्या माध्यमिक आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली असून त्यांना अतिदक्षता विभागातून सामन्य कक्षात हलविण्यात आले आहे.

माणी येथील आश्रमशाभळेत गुरुवारी (ता.16) शाळेतील सुमारे 888 विद्यार्थिनींना दुपारच्या जेवणात खिचडी देण्यात आली होती. यामध्ये कमल गोविंद भोये (धामणकुंड), मनिषा काशिनाथ दळवी (रा. आळीवपाडा), हेमलता रघुनाथ चौधरी (आळीवपाडा), भाग्यश्री दौलत देशमुख (रा. आळीवपाडा), भाग्यश्री काशिनाथ दळवी (आळीवपाडा) व हौसा भागवत भडांगे (रा. हेमांडपाडा) या सहा मुलींना खिचडी खाल्ल्यानंतर अस्वस्थ वाटू लागले होते.

त्यानंतर त्यांच्यावर माणी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्‍यांकडून उपचार करून 108 रुग्णवाहिकेतून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

विषबाधित मुलींवर जिल्हा रुग्णालयात तात्काळ उपचार करण्यात आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे आज सकाळी सहाही मुलींना अतिदक्षता विभागातून महिलांच्या सर्वसामान्य कक्षात दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*