Type to search

येत्या रविवारी नाशकात आंबा महोत्सव

नाशिक

येत्या रविवारी नाशकात आंबा महोत्सव

Share

नाशिक | प्रतिनिधी

सध्या बाजारात रासायनिक पद्धतीने पिकविलेले आंबे मोठ्या प्रमाणात विक्रीस आलेले असून, नागरिकांच्या आरोग्यास ते अत्यंत हानिकारक ठरत आहे.

या पार्श्वभूमीवर नाशिककरांना शेतकऱ्यांकडून थेट ग्राहकांना नैसर्गिक पद्धतीने पिकविलेला आंबा पोहचावा आणि या हंगामातील आंब्याची गोडी नाशिककरांना मोठ्या आनंदाने चाखता यावी या उद्देशाने रविवारी (दि.२६) रोजी आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

रोटरी क्लब ऑफ नाशिकतर्फे या एकदिवसीय महोत्सवाचे केले असून संस्थेच्या गंजमाळ येथील सभागृहात सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यत तो खुला असेल.

या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने थेट शेतकरी ते ग्राहक या साखळीतून आंबा प्रेमी नाशिककरांना या नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्यांचा मनमुराद आनंद लुटता येणार आहे.

या महोत्सवात पेठ, दिंडोरी, त्र्यंबकेश्वर, कळवण या भागांतील शेतकरी निरनिराळ्या जातींची आंबे विक्रीसाठी आणणार आहेत. याशिवाय लोणची बनविण्यासाठी कैऱ्या, मुरांबा आणि कैरी पन्हेसुद्धा विक्रीस असणार आहे.

या आंबा महोत्सवाचा लाभ जास्तीत जास्त नाशिककरांनी घ्यावा असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष राधेय येवले, सचिव मुग्धा लेले, मंथ लीडर किशोर थेटे आणि तुषार उगले यांनी केले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!