Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामांगीतुंगी महोत्सव तयारीचा आढावा; सुविधांची कामे गतीने पुर्ण करा : जिल्हाधिकारी

मांगीतुंगी महोत्सव तयारीचा आढावा; सुविधांची कामे गतीने पुर्ण करा : जिल्हाधिकारी

सटाणा । प्रतिनिधी | Satana

तालुक्यातील मांगीतुंगी (Mangitungi) येथे दि. 15 ते 30 जून या कालावधीत 108 फूट भगवान ऋषभदेव (Bhagvan Rishabhdev) यांचा सहावा आंतरराष्ट्रीय महामस्तकाभिषेक महोत्सव (International Mahamastakabhishek Mahotsav) होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी गंगाथरण डी. (Collector Gangatharan d.) यांनी प्रत्यक्ष भेट देत पुर्वतयारीबाबत पहाणी केली.

- Advertisement -

तीर्थक्षेत्र कार्यकारणी व शासकीय अधिकार्‍यांची संयुक्त बैठक घेत तातडीने उपाययोजना कराव्यात, असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी सर्व विभागांना दिले. यावेळी त्यांचे पीठाधीश रवींद्रकीर्तीजी स्वामी, अध्यक्ष सुमेरकुमार काला, महामंत्री संजय पापडीवाल यांनी स्वागत केले. जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी पार्श्वनाथ मंदिर, तुंगी पर्वतावरील भगवान ऋषभदेव मूर्तीं, आचार्य वसुनंदीजी, आचार्य तीर्थनंदजी गुरुदेव यांचे दर्शन घेतले.

इंजि. सी.आर. पाटील, संजय पापडीवाल, डॉ. सुरजमल जैन यांनी मांगीतुंगी तीर्थक्षेत्राचा हजारो वर्षांपूर्वीचा इतिहास (History), संस्कृती (Culture), धार्मिक कार्यक्रम (Religious program) तसेच झालेल्या व करावयाच्या कामांची माहिती दिली. येत्या 15 जून पासून होणार्‍या महामस्तकाभिषेक कार्यक्रमासाठी देश-विदेशातील साधारण पाच लाख भाविकांसह केंद्र व राज्यातील महत्वपूर्ण लोकप्रतिनिधी, अधिकारी येतील.

त्यादृष्टीने हरणबारी धरणातून थेट तीर्थक्षेत्र व भिलवाड गावासाठी पाणीपुरवठा योजना (Water supply scheme), वीज (electricity), रस्ते (road), आरोग्य सुविधा (Health facilities), शौचालय (Toilet), सुरक्षा (Security) आदी कामे करण्यासंदर्भात ऋषभदेव मूर्ती कमिटी व अधिकार्‍यांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी गंगाथरण यांनी चर्चा केली.

प्रांत बबनराव काकडे (Province Babanrao Kakade), तहसीलदार जितेंद्र इंगळे (Tehsildar Jitendra Ingle), गटविकास अधिकारी पी.एस. कोल्हे (Group Development Officer P.S. Kolhe), महावितरणचे सतीश बोंडे, श्रीवास्तव, पोलीस अधिकारी श्रीकृष्ण पारधी, वन अधिकारी शिवाजी सहाणे, शाखा अभियंता विकास दळवी आदींनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस भूषण कासलीवाल, मोहन जैन, प्रवीण पहाडे, डॉ. जीवन जैन, वर्धमान पांडे, राजू बडजाते, सुवर्णा काला, प्रदीप ठोळे, महावीर पांडे, शैलेश जैन, पंकज काला, चेतन जैन, तलाठी आर.व्ही. खैरनार, राजेंद्र निकम, पंढरीनाथ ठाकरे यांच्यासह दोन्ही ट्रस्टचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या