मंगेश पाटणकर ‘निमा’ अध्यक्ष

वार्षिक सर्वसाधारण सभेत स्वीकारला पदभार

0
सातपूर । नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) ची 45 वी वाषिर्र्क सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली.

नाशिक इंडस्ट्रिज अ‍ॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ची 45 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज(दि.31)निमा हाऊस नाशिक येथे पार पडली. या बैठकीत व्यासपीठावर विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश वैश्य, माजी अध्यक्ष संजीव नारंग, मावळते अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, मानद सरचिटणीस उदय खरोटे, मोठे उद्योग गटाचे चिटणीस नितीन वागसकर, लघुउद्योग गटाचे मानद चिटणीस ज्ञानेश्वर गोपाळे, खजिनदार हर्षद ब्राम्हणकर हे होते.

गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात आली. काही वेळानंतर पुन्हा घेण्यात आलेल्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. चर्चेत माजी अध्यक्ष आर. व्यंकटचेलम, रवी वर्मा, मनीष कोठारी, जे. एम. पवार, अशोक राजवाडे, विवेक गोगटे, निशिकांत अहिरे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश वैश्य यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी मावळते अध्यक्ष हरीशंकर बॅनर्जी यांनी कार्यकाळात केलेल्या कार्याचा आढावा घेताना ‘मेक इन नाशिक’ उपक्रमात कार्यकारिणी सदस्य व मेक इन नाशिक समितीमधील सदस्यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. या उपक्रमामुळे नाशिकमध्ये नवनि उद्योग येण्याचे मार्ग गतिमान झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

पाटणकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतात निमाने पुढाकार घेऊन सुरू केलेल्या ‘मेक इन नाशिक’ या उपक्रमास पुढच्या पातळीवर घेऊन जाणे तसेच नाशिकमध्ये जास्तीत जास्त नवीन उद्योग प्रस्थापित होण्याकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. तसेच निमा कार्यालयाचे डिजिटलायझेशन करणे हा या वर्षात मूळ उद्देश राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष रमेश वैश्य, निमाचे माजी अध्यक्ष जे. एम. पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. उदय खरोटे यांनी केले तर आभार ज्ञानेश्वर गोपाळे यांनी मानले.

या सर्वसाधारण सभेत निवेक अध्यक्ष संदीप सोनार,आयमा अध्यक्ष राजेंद्र अहिरे,लघुउद्योग भारती, अध्यक्ष संजय महाजन, कार्यकारिणी सदस्य मनीष रावल, अखिल राठी, समीर पटवा, संदीप भदाणे, उदय रकिबे, मोहन सुतार, सुनील बाफणा, शिवाजी आव्हाड, श्रीकांत बच्छाव, एस.के. नायर, अर्जून ललवाणी, मृणालिनी गोरे, प्रविण आहेर, अनिल बाविस्कर, एस. जे. देशमूख, एस. एम. डोंगरे, जितेंद्र शिर्के, गौरव धारकर, नीरज बदलानी, विनायक गोखले, मिलींद जगताप, शरद कुलकर्णी, व्हिनस वाणी, समीर पटवा, नीलिमा पाटील, देवयानी महाजन, अनिल बाविस्कर तसेच सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*