Friday, May 3, 2024
Homeनगरकेंदळ खुर्दच्या सरपंचपदी मंदाकिनी आढाव

केंदळ खुर्दच्या सरपंचपदी मंदाकिनी आढाव

आरडगाव (वार्ताहर) –

राहुरी तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या समजल्या जाणार्‍या केंदळ खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मंदाकिनी मच्छिंद्र आढाव

- Advertisement -

यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

दि.19 नोव्हेंबर रोजी प्रथम लोकानियुक्त सरपंच अनीता आढाव यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने सरपंचपद रिक्त झाले होते. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सरपंचपदाची सकाळी 10 वाजता निवड प्रक्रिया सुरु झाली. सरपंचपदासाठी मंदाकिनी आढाव आणि लता राजेंद्र मगर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर मगर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सरपंचपदासाठी आढाव यांचा एकमेव अर्ज राहिल्याने आढाव यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी भाऊसाहेब मेहेत्रे यांनी केली. त्यास ग्रामसेवक पालवे, कामगार तलाठी राहुल कर्‍हाड, दुर्योधन डोईफोडे यांनी सहाय्य केले. यावेळी नूतन पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपसरपंच बाळासाहेब आढाव, अनीता आढाव, राजेंद्र आढाव, सतीश आढाव, गोरक्षनाथ जाधव, संगीता केदारी, मनकर्णा सूर्यवंशी, वृक्षाली आढाव आदी ग्रामपंचायत सदस्यांसह लक्ष्मण आढाव, रामराव आढाव, मच्छिंद्र झिने, अनिल आढाव, बाबासाहेब भोईटे, गणेश आढाव, संदीप आढाव, विकास मगर, आदिनाथ आढाव, गणेश गुंजाळ, अविनाश आढाव, पंढरीनाथ आढाव, शिवाजी आढाव, माणिक मगर, उद्धव आढाव, तंटामुक्ती अध्यक्ष धोंडिराम आढाव, पंढरीनाथ आढाव, ज्ञानेश्वर आढाव, चंद्रकांत आढाव, बाळासाहेब आढाव, अशोक आढाव, नामदेव आढाव, संतोष पवार, कमलाकर आढाव, संभाजी आढाव, उद्धव आढाव, रवींद्र आढाव, पोलीस पाटील प्रल्हाद तारडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन बाबासाहेब भोईटे यांनी केले तर आभार संदीप आढाव यांनी मानले.

- Advertisment -

ताज्या बातम्या