Type to search

Breaking News क्रीडा मुख्य बातम्या

भारत-न्यूझीलंड सामन्यात आजही पाऊस आला तर ?

Share

मॅन्चेस्टर: भारत आणि न्यूझीलंड यामध्ये सुरु असलेल्या सेमीफायनलकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. न्यूझीलंड टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत भारतीय क्रिकेट रसिकांच्या हृदयाची धडधड वाढवून दिली होती. परंतु भारतीय गोलंदाजांनी भेदक मारा करीत किवींना रोखण्यात यश मिळवलं ५० षटकातील अवघ्या ४ ओव्हर शिल्लक असतांना अचानक पाऊस आला अन भारतीय चाहत्यांच्या आशा धुळीस मिळाल्या.

झालं असं… भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप २०१९ मधील पहिली सेमी फायनल खेळत असताना अचानक पावसाने खेळ करीत मॅच अर्ध्यावरच थांबवण्यात आली. यामुळे उर्वरित मॅच आज खेळवण्यात येणार आहे. मात्र सर्व क्रिकेट प्रेमी टीव्ही स्क्रीन समोर असून आजही पाऊस झाला तर ? मॅच होणार की नाही आणि नाही झाली तर काय होणार? असे प्रश्न क्रिकेटप्रेमींच्या मनात उपस्थित होत आहेत.

दरम्यान आज अर्ध्यावरती थांबलेला डाव सुरु होणार असून न्यूझीलंडने ४६.१ ओव्हर्समध्ये ५ विकेट्स गमावत २११ धावा केल्या आहेत. ही मॅच मॅन्चेस्टर येथील वेळेनुसार सकाळी १०. ३० वाजता म्हणजेच भारतीय वेळेनुसार, दुपारी ३ वाजता सुरू होईल.

आज सामना सुरु झाल्यानंतर पाऊस आला तर डकवर्थ लुईस नियमानुसार भारताला रनचेस करावे लागणार आहेत. ते पुढीलप्रमाणे

▪ ४६ ओव्हरमध्ये २३७
▪ ४० ओव्हरमध्ये २२३
▪ ३५ ओव्हरमध्ये २०९
▪ ३० ओव्हरमध्ये १९२
▪ २५ ओव्हरमध्ये १७२
▪ २० ओव्हरमध्ये १४८

पण पाऊस भारतासाठी वरदान….
आज ठरल्या प्रमाणे सामना न झाल्यास म्हणजेच पाऊसामुळे व्यत्यय आल्यास दोन्ही संघापैकी गुणतालिकेत वरच्या स्थानावर असलेल्या संघाला विजयी घोषित केले जाते. म्हणजेच भारताला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळेल. म्हणजेच आज पुन्हा पावसामुळे सेमीफायनल रद्द झाल्यास न्यूझीलंडसाठी खराब संकेत असतील यामुळे त्यांना विश्वचषकातुन बाहेर जावं लागेल.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!