Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

नगर: नगररचनाकार कनिष्ठ अभियंत्याच्या हातचे बाहुले

Share
थकीत करधारकांची नावे झळकली फ्लेक्सवर, Latest News Taxpayer Name Flex Amc Action Ahmednagar

महापालिकेच्या टीपीत अनागोंदी

अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिकेच्या टीपी विभागातील नगररचनाकार कनिष्ठ अभियंत्यांच्या हातचे बाहुले झाले असल्याचा आरोप बिल्डर किरण काळे यांनी केला आहे. कनिष्ठ अभियंत्यांने सांगितल्यानंतरच ले-आऊट, बांधकाम परवानगी मंजुरीची प्रक्रिया नगररचना विभागात सुरू असल्याचा धक्कादायक अनुभव काळे यांना आज बुधवारी आला.

नगररचना विभागात प्रचंड अनागोदी सुरू असून त्याचा फटका बिल्डर लॉबीला बसत आहे. ‘दाम करी काम’ या उक्तीप्रमाणे टीपीतील कामकाज सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव यानिमित्ताने समोर आले. नगररचनाकार रा.ल. चारठाणकर यांना अधिकार असले तरी ते स्वत: काहीच निर्णय घेत नाही. कनिष्ठ अभियंता कल्याण बल्लाळ सांगतील तसंच ते करतात. बल्लाळ यांनी एखादी फाईल किरकोळ कारणास्तव रिजेक्ट केली तर ती क्युरी जागेवरच दुरूस्त करून त्यावर सही करण्याची हिंमत नगररचनाकार चारठाणकर करत नसल्याचे प्रकार आज समोर आला. तत्कालीन नगररचनाकार रा.म.पाटील यांनी मंजूर केलेल्या बांधकाम परवानगीच्या धर्तीवरच नवा मंजुरी प्लॅन काळे हे नगररचना विभागात गेले होते. मात्र त्यांचे ‘वजन’ टेबलावर न पडल्याने त्यांची फाईलच रिजेक्ट करण्यात आली. बल्लाळ हे नगररचना विभागातील जाणते अधिकारी आहेत. त्यामुळे ते सांगतील तसंच नगररचनाकार वागत असल्याचा धक्कादायक अनुभव काळे यांना आला. याबाबत आयुक्तांकडे तक्रार करणार असल्याचे काळे यांनी सांगितले.

कुंपणच खातंय शेत…
बल्लाळ यांच्याविरोधात अनेक नगरसेवकांच्या तक्रारी आहेत. मात्र आयुक्त व पदाधिकारी त्यांच्या पाठीशी आहेत. आयुक्तांनी तर टीपी बल्लाळ यांच्या हवाली करण्याचा अजब आदेश काढला आहे. आयुक्तांकडे जाणारी प्रत्येक फाईल ही बल्लाळ यांच्यामार्फतच जाईल असा हा आदेश आहे. कुंपनच शेत खात असल्याने आयुक्त बल्लाळ यांच्यावर कारवाई करतील की नाही याबाबत काळे यांनी साशंकता व्यक्त केली.

 

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!