सोफ्याच्या बिलाचे चर्चेचे गुर्‍हाळ

0

नगर टाइम्स,

महापालिकेची इज्जत वेशीवर

अहमदनगर (प्रतिनिधी) – पदाधिकार्‍यांच्या दालनातील सोफासेट उचलून नेत ठेकेदाराने महापालिकेच्या इज्जतीचा पंचनामा केला. बाहेर पटांगणात काढलेले सोफे पुन्हा दालनात नेण्यात आले. मात्र बील मिळाले तर ठिक अन्यथा पुन्हा सोफे नेणारच अशी भूमिका ठेकेदाराने घेतल्याने महापालिकेत आज चर्चेचे गुर्‍हाळ सुरू होते. दुपारपर्यंत चर्चेत कोणताच तोडगा निघाला नाही.

महापौर, उपमहापौर, सभागृह नेता, विरोधी पक्षनेता आणि स्थायी समिती सभापती यांच्या कार्यालयात इरफान शेख या ठेकेदाराने फर्निचर व कुशनसोफे पुरविली होते. मागील तीन वर्षापासून वेळोवळी मागणी करून देखील त्याचे बील शेख यांना मिळाले नाही. पत्नीच्या आजारपणावर उपचार करण्यासाठी पैसे हवेत, आर्थिक अडचण आहे असे सांगत त्याची सर्व कागदपत्र आयुक्तांकडे दिली. आयुक्तांनी शेख यांच्या देयकास विशेष मंजुरीही दिली पण त्याचे चेक काढण्याला मुर्हूत मिळेना. मागणी करूनदेखील बिल मिळत नसल्याने मंगळवारी शेख यांनी महापालिकेतून फर्निचर व सोफे घेऊन पटांगणात ठेवले. संबधित पदाधिकार्‍यांनी ठेकेदाराच्या भूमिकेला विरोध करत सोफे परत कार्यालयात ठेवले. कलेक्टरांनी संबंधित ठेकेदारांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले, पण असा कोणताच गुन्हा दाखल झाला नाही.

गुरूवारपर्यंत बील मिळाले तर ठिक अन्यथा शुक्रवारी पोलीस बंदोबस्तात फर्निचर नेले जाईल. पोलीस बंदोबस्त मिळावा अशी मागणी एसपींकडे करण्यात आली आहे. कलेक्टर तथा प्रभारी आयुक्त द्विवेदी यांना बील द्या किंवा फर्निचर घेऊन जाण्याची परवानगी द्या असे निवेदन दिले असल्याची माहिती इरफान शेख यांनी ‘नगर टाइम्स’ला दिली.

 

LEAVE A REPLY

*