मनपाचा वसुली लिपीक लाचलुचपतच्या जाळ्यात

0

24 हजार लाचेची मागणी 

अहमदनगर (प्रतिनिधी) – महानगरपालिकेच्या हाद्दीत खरेदी केलेल्या दोन प्लॉटची गुंठेवारीप्रमाणे बिगरशेती करुन देण्यासाठी मनपातील वसुली लिपीक अनिल वसंतराव लोंढे याने 24 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्विकारताना त्यास नगरच्या लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.

याप्रकरणी त्यास अटक करून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आरोपी लोंढे हा महानगरपालिकेत वसुली लिपीक म्हणून कार्यरत आहे. त्याने बुधवारी (दि.14)तक्रारदाराच्या आईकडे मनपाच्या हाद्दीत खरेदी केलेल्या दोन प्लॉटची गुंठेवारी प्रमाणे बिगरशेती करण्यासाठी 24 हजारांची मागणी केली होती.

ही रक्कम देण्यास या महिलेने नकार दिला. मात्र पैशाशिवाय काम होणार नाही, असे सांगून लोंढे याने 24 हजार देण्यास भाग पाडले. सर्व कागदपत्रे जमा केलेले असताना वेगवेगळ्या तृटी काढून पैशासाठी त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचे महिलेच्या लक्षात अमाले. तिने हा प्रकार तिच्या मुलास सांगितला असता त्याने नगरच्या लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला.

लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक विष्णु ताम्हाणे यांनी जुन्या महानगरपालिकेत सापळा रचून लोंढे यास 24 हजार रुपयांची रक्कम स्विकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई डॉ. पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णु ताम्हाणे, पोलीस निरीक्षक विष्णु आव्हाड, शाम पवरे, पोलीस कर्मचारी सुनिल पवार, एकनाथ आव्हाड, वसंत वाव्हळ, नितीन दराडे, तन्वीर शेख, प्रशांत जाधव, आंबादास हुलगे या पथकाने केली.

आज न्यायालयात हजर करणार-

आज न्यायालयात हजर करणार  नागरिकांनी लोकसेवकांकडून होणार्‍या आर्थिक मागणीला बळी पडू नये. जर कोणी लाच मागत असेल तर त्याबाबत 1064 या टोल फ्रि क्रमांकावर संपर्क साधावा. व भ्रष्टाचार रोखण्यापासून शासनाला मदत करावी. लोंढे यास अटक करण्यात आली आहे. घरझडती, बँक खाते तपासणे, सह आरोपी, अशी चौकशी सुरू आहे. आज त्यास न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*