Type to search

भालसिंंग यांच्या रजेमुळे आयुक्तांचा पदभार कोणाकडे?

Featured सार्वमत

भालसिंंग यांच्या रजेमुळे आयुक्तांचा पदभार कोणाकडे?

Share
अहमदनगर (प्रतिनिधी) – महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार पुन्हा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे येण्याची शक्यता आहे. सोमवारपासून आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग दीर्घ मुदतीच्या रजेवर जात असल्याने हा बदल होण्याची शक्यता आहे. आयुक्त भालसिंग यांच्या घरी मंगल कार्य असल्याने त्यांनी दीर्घमुदतीची रजा टाकली आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्याकडे त्यांनी रजेचा अर्ज दिला असून, सोमवारपासून ते रजेवर असतील. त्यामुळे त्यांची रजा संपेपर्यंत आयुक्तांचा पदभार कोणाकडे तरी सोपवावा लागणार आहे.

यापूर्वी आयुक्त रजेचा अर्ज देताना पदभार कोणाकडे सोपवायचा, याबाबत अर्जात उल्लेख करत असत. मात्र भालसिंग यांनी तसा कोणताही उल्लेख केलेला नाही. अतिरिक्त आयुक्तपद देखील रिक्त आहे. या जागेवर असलेले विलास वालगुडे नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याकडे जाऊ शकतो.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!