संगमनेरात एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट : मालपाणी

0
वृक्ष आपल्या दारी ; मालपाणी उद्योग समूहाचा उपक्रम
संगमनेर (प्रतिनिधी) – झाडे लावा.. झाडे जगवा.. असा केवळ नारा न देता शहरातील प्रत्येक वसाहतीत वृक्षमित्र पाठवून स्वतः वृक्ष लागवड करण्याचा अनोखा उपक्रम युवा उद्योजक मनीष मालपाणी यांनी सुरू केला आहे. ‘वृक्ष आपल्या दारी’ या नावाने सुरू झालेल्या या उपक्रमास संगमनेरकरांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे.
कामाच्या व्यग्रतेत इच्छा असूनही अनेकांना आपल्या घराच्या परिसरात झाडे लावणे शक्य होत नाही. या उपक्रमाच्या माध्यमातून अशा सर्व ठिकाणी वृक्षारोपणाचा प्रयत्न असल्याचे मनीष मालपाणी यांनी सांगितले.
वाढत्या कॉक्रीटीकरणामुळे सर्वत्र मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत आहे.
त्याबदल्यात पुन्हा झाडे लावली जात नसल्याने पृथ्वीचे पर्यावरणीय संतुलन बिघडले आहे. त्यावरील एकमेव उपाय म्हणजे झाडे लावा.. झाडे जगवा.. मात्र दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपणासाठी प्रोत्साहन देऊनही ठराविक सामाजिक संस्था व नागरीक वगळता या उपक्रमात लोकसहभागाची वानवा असल्याने श्री. मालपाणी यांनी ‘वृक्ष आपल्या दारी’ ही अभिनव संकल्पना राबविली आहे.
यासाठी मालपाणी ङ्गार्ममध्ये गेल्या वर्षभरात तब्बल एक लाख रोपे तयार केली गेली. घरापुढे लागवड करण्यायोग्य विविध ङ्गुलांच्या व औषधी गुणधर्म असलेली 21 प्रकारची ही रोपे वृक्षारोपण करणार्‍या विविध संस्थांना व नागरिकांना मोङ्गत वाटली गेली.
सोबत अनेकांना व्यस्त दिनक्रमामुळे इच्छा असूनही आपल्या घराच्या परिसरात झाडे लावता येत नाही. अशा नागरीकांना दिलासा देण्यासाठी मालपाणी उद्योग समूहाची वृक्षमित्र टीम सर्व साधनांसह आपल्या दारी येते. आपल्या इच्छेनुसार आपणास हव्या त्या ठिकाणी उपलब्ध रोपातील हवे ते रोप या टीमकडूनच लावले जाते.
या रोपांची निवडही अनेक बाबींचा विचार करून करण्यात आली आहे. आपल्या घराचे, बंगल्याचे, कंपांउंडच्या भिंतीचे ज्या झाडांच्या मुळांनी अजिबात नुकसान होणार नाही अशीच रोपे वृक्षलागवडीसाठी निवडण्यात आली आहेत. या टीमकडून वृक्षारोपण करणार्‍यांनी ङ्गक्त लावलेल्या रोपाची देखभाल व त्यांचे मर्यादित काळासाठी संगोपन करावे असे आवाहनही श्री. मालपाणी यांनी केले आहे.

संगमनेर शहराच्या सर्व भागांमध्ये वृक्षांची संख्या वाढावी यासाठी मालपाणी उद्योग समूहाच्या वृक्षमित्रांकडून प्रभागनिहाय नियोजन करण्यात आले आहे. वृक्षमित्र सर्व साधनांसह आपल्या कॉलनीत येतील, आपण म्हणाल तिथे उपलब्ध असलेली विविध रोपे लावून देतील. नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाच्या या उपक्रमात सहभागी होत आपल्या परिसरात वृक्षारोपण करवून घ्यावे व किमान वर्षभर त्याचे संगोपन करावे. आपण प्रत्येकाने ङ्गक्त खारीची जबाबदारी उचलली तर संगमनेर शहर हरित होण्यास वेळ लागणार नाही. शहर व परिसरात जवळपास एकलाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.
-मनीष मालपाणी,
संचालक, मालपाणी उद्योग समूह

LEAVE A REPLY

*