Type to search

Featured सार्वमत

नवाब मलिक यांच्याकडून अण्णा हजारेंची लेखी माफी

Share

उपोषणादरम्यान मलिक यांनी केली होती टीका

पारनेर (तालुका प्रतिनिधी) – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मध्यंतरी केलेल्या विविध मागण्यांसाठीच्या उपोषणाबाबत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका करून हजारे संघाकडून पैसे घेऊऩ उपोषण करतात, असे म्हटले होते. त्यावरून राज्यभर गोंधळ उडाला होता. हजारे यांनी त्यांंना कायदेशीर नोटीसही पाठविली होती. अण्णांनीही या वादावर पडदा टाकला आहे.

मलिक यांनी टीका केल्यामुळे हजारे यांनी 2 फेब्रुवारीला पुणे येथील अ‍ॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांच्यामार्फत त्यांना कायदेशीर नोटीस पाठविली होती. हजारे लोकपाल व लोकआयुक्तांची नियुक्ती करावी यासह शेतकर्‍यांसंदर्भातील विविध मागण्यांसाठी उपोषणास बसले होते. त्यावेळी नवाब मलिक यांनी अण्णा हजारे हे संघ परिवाराकडून व वकिलांकडून पैसे घेऊन उपोषणे करतात असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर लगेच ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली होती. मलिक यांनी मात्र आपल्या वक्तव्याबाबत कोणताच खुलासा केला नव्हता. राजकीय फायदा डोळ्यासमोर ठेवून जाणीवपूर्वक हजारे यांच्याविषयी बदनामी करण्याच्या उद्देशाने व समाजात चुकीचा समज निर्माण व्हावा म्हणून मलिक यांंनी वक्तव्य केल्याची भावना अण्णा व त्यांच्या समर्थकांमध्ये निर्माण झाली होती. त्यामुळे हजारे यांनी अ‍ॅड. मिलींद पवार यांच्यामार्फत त्यांना कायदेशीर नोटीस पाठवली होती. त्याची प्रत अजित पवार यांनाही पाठविली होती.

नवाब मलिक यांनी अ‍ॅड. पवार यांना रजिस्टर्ड पत्राद्वारे दिलगीरी व्यक्त केली आहे. आपण वडीलधारी व्यक्ती असून आपले मन दुखावल्याने मी दिलगीरी व्यक्त करतो, असे म्हटले आहे. या पत्रानंतर ‘नवाब मलिक यांनी पत्र पाठविल्याने आपल्याला या प्रकरणी कोणताही वाद वाढवायचा नाही,’ असे अण्णांनी अ‍ॅड. पवार यांना सांगून वादावर पडदा टाकला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!