Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : नुकसानीचा मोबदला मिळावा दाभाडी बायपास रोड येथे रास्ता रोको आंदोलन

Share

मालेगाव : अवकाळी पावसामुळे शेतकर्‍यांच्या झालेल्या शेतमालाच्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा, सरसकट कर्ज माफ करुन ७/१२ कोरा करावा, शेतकर्‍यांचे विजबिल माफ करावे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळावी या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधूनघेण्यासाठी रविवारी (दि.3) दाभाडी बायपासरोड येथे ग्रामस्थ, शेतकरी व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी आंदोलकांची भेट घेतली.

गत पंधरवड्यापासून तालुक्यात परतीच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या रास्तो रोको दरम्यान शेतकर्‍यांनी सडलेला चार, डाळिंब, कांदा, मका, बाजरीची कणस हा शेतमाल रस्त्यावर टाकत रास्ता रोको आंदोलन केले.

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत निकम, निळकंठ निकम, हेमराज भामरे, डॉ. एस. के. पाटील, जगदीश पवार, बापू निकम, दिलीप निकम, शेखर पवार, रमेश निकम, विजय शेवाळे, सुधाकर निकम, छाटू हिरे यांची भाषणे झाली. अमोल निकम यांनी प्रास्ताविक केले तर हरिदादा निकम यांनी निवेदनाचे वाचन केले. तालुका कृषी अधिकारी अशोक पवार, मंडळ अधिकारी रविंद्र शेवाळे यांना आंदोलकांच्यावतीने निवेदन देण्यात आले.

याप्रसंगी भुविकास बँकेचे माजी संचालक दशरथ निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण देवरे, माजी सरपंच अ‍ॅड. सुधाकर निकम, भिकन निकम, वसंत देवरे, उपसरपंच सुभाष नहिरे, वंसत मोरे, नामदेव निकम, यशवंत निकम, किशोर निकम, पुताजी निकम, किरण निकम, निखील पवार, अनिल निकम, रावसाहेब निकम, मंगेश निकम, बापू भामरे, खंडू देवरे, उत्तम सूर्यवंशी, हर्षल निकम, काकाजी निकम, सुरेश पवार, सागर देवरे, पंडित देवरे, दिनानाथ देवरे, सचिन निकम, पप्पू शिंदे यांच्यासह तलाठी, पी. पी. मोरे, कृषी सहायक जी. एच. लकारे, त्र्यंबक मानकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!