Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : सिलेंडरच्या स्फोटात चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू; पाच जण गंभीर

Share
मालेगाव : सिलेंडरच्या स्फोटात चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू; पाच जण गंभीर Malegoan explosion Gas Cylinder While Blowing Balloons in Pilgram, ghodegoan, malegoan, cylider Blast, Breaking News

मालेगाव : घोडेगाव येथील यात्रेत फुगे फुगवण्याच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने चौदा वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये पाच जण जखमी असून दोघं गंभीर जखमींना धुळे येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान अधिक माहिती अशी घोडेगाव परिसरातील खडकवस्ती येथे उलानबी पीरबाबा यात्रोत्सवात आज सकाळच्या सुमारास हि घटना घडली. फुगे घेणयासाठी गर्दी जमली असता अचानक स्फोट झाल्याने एकच तारांबळ उडाली. यात चौदा वर्षीय सोनाली सुभाष गांगुर्डे हिचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच जखमी झाले . यामध्ये फुगे विक्रेता अन्वर अली अक्लबर अली (मालेगाव) हा देखील जखमी झाला आहे. शुभांगी पवार, पूनम गायकवाड, राजेंद्र पवार, रामलाल गांगुर्डे, अनिल वाघ अशी जखमींची नावे आहेत . जखमींना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी स्फोटाचा प्रचंड आवाज झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच पोलिसांनी घटनेची माहिती देण्यात आली. यावेळी फुगे विक्रेत्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेने गावात शोककळा पसरली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!