मालेगाव मनपाचे सर्व निकाल जाहीर; महापौराबद्दल उत्सुकता

मालेगाव मनपात काँग्रेसला सर्वाधिक जागा

0

मालेगाव, (प्रतिनिधी) ता. २६ : मालेगाव महापालिका निवडणूकीचे सर्व ८४ निकाल हाती आले असून काँग्रेसला सर्वाधिक म्हणजे २८ जागा मिळाल्या आहेत, तर २० जागा घेऊन राष्ट्रवादी दुसऱ्या स्थानावर आहे.

शिवसेनेला १३ जागा मिळाल्या असून भाजपाचे ९ जागा मिळवत आपले स्थान बळकट केले आहे.

एमआयएमने मालेगावमध्येही प्रवेश केला असून या पक्षाचे ७ उमेदवार निवडून आले आहेत. जनता दलाला ६ जागा मिळाल्या असून एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे.

जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस आणि तिसरा महाज यांनी मनपा निवडणुकीत आघाडी केली होती. त्यामुळे त्यांचे पक्षीय बल २६ पर्यंत पोहोचले आहे.

मालेगावमध्ये महापौर होण्यासाठी ४३ हा  जादुई आकडा असून तो कोणता पक्ष मिळवतो याकडे आता मालेगावकरांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*