Type to search

मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील शेतकऱ्याची आत्महत्या

Share

मालेगाव l प्रतिनिधी
कर्जबाजारीपणाला कंटाळून मालेगाव तालुक्यातील टिंगरी येथील शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली. भटू निंबा पवार असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रात्री बारा वाजेच्या सुमारास शेतातील घरात विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.

पवार यांच्यावर हातउसनवारीसह सिंडिकेट बँकेचे 6 ते 7 लाखांचे कर्ज होते. कुटुंबात मोठी व्यक्ती असल्यामुळे ते नेहमीच आर्थिक विवंचनेत असायचे.

घटनास्थळी तहसीलदार चंद्रसिंग राजपूत यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले. याप्रकरणी वडणेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी, दोन लहान भाऊ असा परिवार आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!