Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

सौंदाणे : पुरपाणी सोडण्यासाठी ग्रामस्थांचे आमरण उपोषण

Share

उमराने : गिरणा उजवा कालव्याचे पुरपाणी सौदाणे जवळील चारी क्र ०१ व पोट चाऱ्याना मिळावे म्हणून आज सौदाणे येथील 150ते200 शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत ओट्यावर सकाळी नऊ वाजेपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

गिरणा उजवा कालवाद्वारे दोन महिन्या पासून पूरपाणी सोडण्यात आले आहे. परंतु चारी क्र. एक ला वारंवार पाणी सोडणे बाबत तोंडी व लेखी मागणी करून सुद्धा आजपर्यंत पाणी आलेले नाही. तसेच सौंदाणे गाव व परिसरात मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती व यावर्षीही समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे सदर चारी क्र. एक १९८१ पासून तयार आहे.

परंतु पाच वर्षांपासून ह्या चारीला पाणी सोडले जात नाही, सोडले तरी मुख्यकालवा खाली असल्याने पाणी अत्यंत कमी येते. ह्या चारीमुळे गावाच्या पिण्याच्या पाण्याचा विहिराला फायदा होतो. साधारण तीन तलाव भरले जातात, परंतु वरील २०० हेक्टर क्षेत्र पाण्यावाचून वंचित आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई व जनावरांना पाण्यासाठी सरपंच डॉ मिलिंद पवार यांनी (दि. १९) ऑगस्ट रोजी पत्र दिले आहे. सदर चारी क्र १ ला संबधित अधिकारी हेतू पुरस्कार टाळाटाळ करत असल्याची जाणीव होत आहे.

तरी आमच्या गंभीर पाणी प्रश्नाबाबत सोडवणूक न झाल्यने सौंदाणे ग्रामस्थ चारी क्र १ व दीड या चारीवरील सर्व शेतकरी हे ग्रामपंचायत सौंदाणे समोर आमरण उपोषणास बसले आहेत. आमच्या पाणी प्रश्नाबाबत असलेली समस्या सुटेपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी सांगितले आहे.

ह्या उपोषणात प्रल्हाद पवार, कैलास पवार , लक्ष्मण पवार , मधुकर पवार, व्यंकट पवार, शांताराम पवार, वेडू पवार, शिवाजी पवार, प्रकाश पवार, राघो पवार, संजय पवार, प्रविण अहिरे, कुसुम पवार, सुशिला पवार, विमल पवार, बिना पवार, अक्षय पवार, दादासाहेब पवार, विजय पवार, विलास पवार आदी शेतकरी तथा महिलांनी सहभाग घेतला आहे. दरम्यान पाटबंधारे अधिकारी अशोक बोरसे यांनी भेट दिली परंतु जोपर्यंत लेखी आश्वासन देणार नाही तोपर्यंत उपोषण सोडण्यात येणार नाही असे सांगितले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!