Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगावबाह्य : शिवसेनेचे राज्यमंत्री दादा भूसेंना दहा हजार मतांची आघाडी; डॉ. तुषार शेवाळे पिछाडीवर

Share

नाशिक | प्रतिनिधी

राज्याच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून धुरा सांभाळणाऱ्या शिवसेनेच्या दादाजी भुसे यांनी मालेगाव बाह्यमधून पुन्हा एकदा आघाडी घेतली आहे. दहा हजार ६३० मतांची आघाडी भुसे यांनी घेतल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष बघायला मिळत आहे.

२०१४ साली भुसे यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चाखत आपला विजय निश्चित केला होता. पुन्हा एकदा त्यांची विजयी घोडदौड सुरु राहताना याठिकाणी दिसून येत आहे.

मविप्रचे अध्यक्ष आणि प्रतिष्ठित डॉक्टर तुषार शेवाळे यांना कॉंग्रेसने बाह्यमधून उमेदवारी देत दादा भुसे यांच्या वाटेत काटा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चलबिचल झाली होती. अखेर दादाजी भुसे यांनी तिसऱ्या फेरीअंती आघाडी घेतल्याने जल्लोषाचे वातावरण याठिकाणी झाले आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!