Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव बाह्यमध्ये शिवसेनेचे दादा भुसे विजयी; डॉ. तुषार शेवाळे पराभूत

Share

नाशिक | प्रतिनिधी

राज्याच्या मंत्रिमंडळात ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून धुरा सांभाळणाऱ्या शिवसेनेच्या दादाजी भुसे यांनी मालेगाव बाह्यमधून पुन्हा एकदा विजयश्री प्राप्त केली आहे. भूसेंच्या झंझावातात दांडगा जनसंपर्क असलेल्या डॉ. तुषार शेवाळे यांचा दारूण पराभव झाला. या निवडणुकीत भुसे यांनी ४७ हजार ६८४ मतांनी आघाडी घेत विजय संपादन केला. भुसे यांनी सुरुवातीपासूनची आघाडी अबाधित ठेवल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मालेगावात एकाच जल्लोष केला.

२०१४ साली भुसे यांनी विरोधकांना पराभवाची धूळ चारत  आपला विजय निश्चित केला होता. पुन्हा एकदा त्यांची विजयी घोडदौड २०१९ मध्येही कायम असल्याचे दिसून आले.

मविप्रचे अध्यक्ष आणि प्रतिष्ठित डॉक्टर तुषार शेवाळे यांना कॉंग्रेसने बाह्यमधून उमेदवारी देत दादा भुसे यांच्या वाटेत काटा आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात चलबिचल झाली होती; मात्र, दांडगा जनसंपर्क, बारा बलुतेदारांची खंबीर साथ यामूळे पुन्हा एकदा मालेगाव बाह्यमध्य भगवा फडकला आहे.

बाह्य मतदारसंघात मालेगाव शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, सोयगाव नववसाहत, द्याने, कलेक्‍टरपट्टा या शहरी भागासह ग्रामीण भागातील ७६ गावांचा समावेश आहे. सर्वच ठिकाणाहून भुसे यांनी आघाडी कायम ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!