Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावात हाहाकार!; जोरदार पर्जन्यवृष्टी, वादळामुळे झाडे उन्मळून पडली

मालेगावात हाहाकार!; जोरदार पर्जन्यवृष्टी, वादळामुळे झाडे उन्मळून पडली

मालेगाव | प्रतिनिधी

मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास शहरात दाखल झालेल्या निसर्ग चक्रीवादळाने सौम्य रूप धारण केल्याने मालेगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला मुसळधार पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे पाणी तुंबण्यासह वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या. मात्र, सुदैवाने जीवित अथवा वित्तहानी झाली नाही.

- Advertisement -

दिवसभर उत्सुकता शिगेला पोहोचलेल्या निसर्ग चक्रीवादळाचे मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास आगमन झाले. दिवसभर उघडकीप घेत पडत असलेल्या पावसाच्या सरी ऐवजी मुसळधार पर्जन्यवृष्टी वादळी वाऱ्यासह सुरू झाल्याने नागरिकांना चक्रीवादळाची चाहूल लागली. मात्र रायगड मुंबईकडे असलेला वाऱ्याचा वेग शहरात कमालीचा कमी असल्याचे दिसून आले.

वादळी वाऱ्यासह होत असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे शहरात कॅम्प भागात शीतला माता नगर येथे 11000 केव्हीच्या प्रवाहित तारेवर मोठे वृक्ष उन्मळून पडले याची माहिती मिळताच मनपा आपत्ती निवारण पथकाने घटनास्थळी त्वरेने धाव घेत वीज पुरवठा खंडित करून कटरने वृक्ष कापून तारा मोकळ्या करत वीज पुरवठा काही तासात पुन्हा सुरळीत केला.

दुसरी घटना सलाम चाचा रोड अशानगर कबरस्तान येथे घडली या ठिकाणीदेखील रस्त्यावर वृक्ष उन्मळून पडले होते ते मनपा पथकाने कटरने कापून अडथळा दूर केला.

मुसळधार पावसामुळे शहर पोलिस ठाण्या लगत असलेल्या नियंत्रण कक्षात पावसाचे तुंबलेले पाणी शिरले मनपा पथकाने कुदळ व पहारीच्या साहाय्याने खोदकाम करत हे पाणी बाहेर काढले. तर आजाद नगर भागात कचऱ्यामुळे मोठा नाला तुंबल्याने पाणी रस्त्यावर वाहु लागले होते याची माहिती मनपा पथकास मिळतात घटनास्थळी नाव घेण्यात येऊन अडकलेला कचरा स्वच्छता सेवकांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढतात नाला प्रवाहित केल्याने परिसरातील वस्ती वरील अनर्थ टळला.

- Advertisment -

ताज्या बातम्या