मालेगाव मनपा निवडणूक : दीड पर्यंत ३४.०३ टक्के मतदान

0

मालेगाव : आज सकाळपासून मालेगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला शांततेत सुरुवात झाली. किरकोळ वाद वगळता एकूणच मतदान शांततेत सुरु आहे.

उन्हाची काहिली जाणवू लागल्यामुळे दुपारी मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली असून सध्या संथगतीने मतदान सुरु आहे.

मालेगावमध्ये आज २१ प्रभागातील ८३ जागांसाठी मतदान होत असून ३७३ उमेदवारांचे भवितव्य इव्हिएम यंत्रांत बंद होत आहे. मालेगावात कॉंग्रेसने सर्वाधिक जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

सकाळच्या सत्रात मात्र अनेकांनी मतदानांचा हक्क बजावला. साडेअकरा वाजेपर्यंत २३.८३ टक्के मतदान झाले होते.

दुपारी दीड पर्यंत ३४.०३ टक्के मतदान झाले.

त्यानंतर मात्र काहीश्या प्रमाणात मतदारांनी पाठ फिरवल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता वर्तवली जाते आहे.

LEAVE A REPLY

*