Friday, April 26, 2024
Homeनाशिकमालेगावात पुन्हा १४ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह; दोघांचा दुर्दैवी अंत; रुग्णसंख्या पोहोचली ६२...

मालेगावात पुन्हा १४ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह; दोघांचा दुर्दैवी अंत; रुग्णसंख्या पोहोचली ६२ वर

नाशिक । प्रतिनिधी

मालेगावमध्ये पुन्हा आज सायंकाळी मिळालेल्या आकडेवारीनुसार नवे १४ रुग्ण कोरोना बाधित सिद्ध झाले आहेत. शहरातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६२ वर पोहोचली आहे तर चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये आज एक वयोवृद्ध महिला आणि पुरुषाचा मृत्यू झाला आहे. तर एका व्यक्तीचे अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता तसेच एका तरुणीचा मृत्यू धुळे येथील रुग्णालयात झाला आहे.

- Advertisement -

मालेगावचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून चिंता व्यक्त केली जात आहे. आज आढळून आलेले १४ रुग्ण हे मालेगाव शहरातीलच असल्याचे सांगण्यात आले आहे. यात ४५ वर्षीय चंदनपुरी गेट परिसर, ७५ वर्षीय रुग्ण गुरवार वार्ड, १७ वर्षीय मुलगा बेलबाग, ९ वर्षीय मुलगी बेलबाग, ४२ वर्षीय महिला बेलबाग,२६ वर्षीय युवक हजार खोली, ४० वर्षीय प्रौढ सिद्धार्थ वाडी, ३५ वर्षीय महिला सिद्धार्थ वाडी, ३८ वर्षीय महिला इस्लामाबाद परिसर, ४० वर्षीय व्यक्ती इस्लाम पुरा तर ६२ वर्षीय वृद्ध व्यक्ती नयापुरा इतर ७१ वर्षीय व्यक्ती  यांचा समावेश आहे.

आज आलेल्या अहवालात दोघांचा कोरोनामुळे दुर्दैवी अंत झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये ५५ वर्षीय महिला ज्या सोमवारी (दि. १३) रोजी मयत झाल्या होत्या. त्यांचाही घशाचा स्राव घेऊन तपासणीला पाठवला होता. आज त्यांचाही अहवाल कोरोनाबाधित सिद्ध झाला आहे. तसेच आज मालेगावमध्ये एका ८१ वर्षीय वृद्ध डॉक्टरचाही मृत्यू झाला असून त्यांचाही अहवाल कोरोनाबाधित सिद्ध झाला आहे. दोघेही रुग्ण श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते.

दोन्हीही दगावलेल्या रुग्णांमध्ये महिला नयापुरा परिसरातील तर वृद्ध डॉक्टर इस्लामपुरा परिसरातील असल्याचे समजते. मालेगावमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेले कोरोनाचे रुग्ण चिंतेची बाब आहे. नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण ७० वर  पोहोचली आहे. यामध्ये मालेगाव शहर, नाशिक ग्रामीण मधील तालुके आणि नाशिक शहराचा समावेश आहे.

आजच्या ताज्या आकडेवारीनुसार मालेगाव शहरात कोरोना बाधितांची संख्या ६२ वर पोहोचली आहे. तर नाशिक शहरात पाच आणि  जिल्ह्यातील इतर तालुक्यात तीन रुग्ण कोरोना बाधित आहेत. त्यांच्यावर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या