महिलाशक्तीचा विजय; मालेगावातील चंदनपुरीत बाटली आडवीच राहणार

0
चंदनपुरी | 

चंदनपुरीत बाटली आडवीच राहणार हे मतदानाच्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे. एकूण 2091 महिलांपैकी मतदानात  1237 महिलांनी भाग घेतला. त्यापैकी ११११ महिलांनी दारूबंदीच्या बाजूने,तर ६९ महिलांनी दारूविक्रीच्या बाजूने कौल दिला. ५७ मते बाद झाली. त्यामुळे महिलांच विजय झाला. खंडेराव महाराजांच्या जयजयकाराने या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले.


राज्य शासनाकडून तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेल्या चंदपुरीमध्ये आज महिलांनी दारूबंदीसाठी एकत्र येत एल्गार पुकारला आहे. दारूबंदी हवी कि नको यासाठी सकाळपासून सुरु असलेल्या मतदानाला वृद्ध महिला, तरुणींसह विवाहित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत.

चंदनपुरी गावात चार मद्यविक्रीची दुकाने व महामार्गावर ११ मद्यविक्री केली जात होती. याठिकाणी मद्यपींचा उपद्रव वाढला होता. त्यामुळे देवस्थानाचे पावित्र्य नष्ट होत होते. यामुळे येथील महिलांनी एकत्र येत दारूबंदी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या.

चंदनापुरी ग्रामपंचायतीत येथील महिलांनी दारूबंदीचा ठराव पास करून घेतला होता. त्यानंतर हा ठराव जिल्हाधिकारी व विभागीय उत्पादन शुल्क अधिकारी यांना पाठवण्यात आला. त्यानंतर याठिकाणी मतदान घेऊन दारूबंदीवर निर्णय घेण्यात येणार आहे.

मतदान प्रक्रियेत जवळपास २०९४ महिला मतदार मतदान करत आहेत.  मतमोजणी करून आजच याठिकाणी निर्णय होणार असल्याची माहिती प्रतिनिधीकडून मिळते आहे. 

मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी तहसीलदार शिवकुमार आवळकंठे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक किशोर गायकवाड यांनी मतदान केद्रांना भेट देऊन पाहणी केली. सायंकाळी सहा वाजता मतमोजणी पार पडणार आहे. त्यानंतर चंदनापुरीत बाटली आडवी राहणार का उभी हे स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

*