Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

मालेगाव : ओवेसी समाजफॅक्टर अस्रापुढे कॉंग्रेसला पळता भुई थोडी; ‘एमआयएम’चा उमेदवार विजयी

Share

मालेगाव | प्रतिनिधी 

कॉंग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मालेगाव मध्यमध्ये ओवेसी समाजफॅक्टर अस्रापढे कॉंग्रेसला पळता भुई थोडी झाली आहे. याठिकाणी माजी आमदार मोहम्मद इस्माईल अब्दुल खालिक यांचा विजय झाला तर विद्यमान आमदार शेख रशीद यांचा दारूण पराभव झाला. मोहम्मद इस्माईल यांच्या विजयाने मालेगावमध्ये ओवेसी यांच्या एमआयएमने प्रवेश करत कॉंग्रेसला घायाळ केले.

मोहम्मद इस्माईल हे मुस्लीम धर्मगुरू आहेत. २००४ ते २००९मध्ये ते राष्ट्रवादीचे आमदार होते. दरम्यान कॉंग्रेसने २०१४ साली त्यांचा पराभव केला होता. यंदा ही जागा कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीमुळे कॉंग्रेसला सुटली. यामुळे मौलाना मुफ्ती यांनी २२ नगरसेवकांसह एमआयएम पक्षात प्रवेश केला. महापालिकेतील २२ नगरसेवक आणि एमआयएमचे मालेगाव महापालिकेतील ०७ नगरसेवकांनी मौलाना मुफ्ती यांच्यासाठी मोट बांधली.

याठिकाणी ओवेसी यांच्या पक्षाचे चाहते खूप आहेत. त्यांच्या कट्टरतावादी भाषणामुळे तरुण वर्ग एमआयएमच्या बाजूने सरकला. याठिकाणी ओवेसी यांचे भाषण झाले. मौलाना मुफ्ती मोमीन समाजाचे नेते आहेत मुस्लीम धर्मात असलेला कट्टरतावाद ही त्यांची जमेची बाजू होती.

मालेगावमध्ये ओवेसी आणि समाज कट्टरतेची मोठी क्रेज आहे. वाऱ्याची दिशा बघून मौलाना मुफ्ती यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. त्यांना महापालिकेतील माजी महापौर युनुस मुसा, स्थायी समिती सभापती परवेज यांच्यासह ७ नगरसेवकांनी पाठींबा देत शहरासोबतच झोपडपट्टी परिसरात प्रचार केला. मालेगावमध्ये कॉंग्रेसने विकासकामे डोळ्यासमोर ठेवून निवडणुकीला सामोरे गेली तर एमआयएमने कॉंग्रेसच्या काळात झालेल्या भ्रष्टाचाराचा आधार घेऊन निवडणूक लढविली.  कॉंग्रेसच्या बालेकिल्ल्याला एमआयएमने सुरुंग लावत सत्ता काबीज करण्यात यश मिळवले.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!