Type to search

Breaking News Featured आवर्जून वाचाच क्रीडा नाशिक मुख्य बातम्या

Photo Gallery : एकता, शांतता आणि सुरक्षिततेसाठी धावले हजारो मालेगावकर

Share

नाशिक | प्रतिनिधी

जिल्हयातील विविध धर्मियांमध्ये एकता, शांतता आणि सुरक्षिततेसाठी तसेच सामाजिक सलोख्यासाठी आज मालेगाव मरेथानमध्ये हजारो स्पर्धकांनी सहभाग घेतला. आबालवृद्धासह अनेकांनी आज सकाळी सहा वाजता मालेगाव मरेथानची शोभा वाढविली.

नाशिकचे पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतुन कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहून सामाजिक सलोखा जपला जावा यासाठी ग्रामीण पोलिसांनी या मरेथाचे आयोजन केले होते.

हे या स्पर्धेचे दुसरे पर्व आहे. स्पर्धेला राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री तथा मालेगाव बाह्यचे शिवसेना आमदार दादाजी भुसे यांच्यासह अधीक्षक संजय दराडे यांनी हिरवा झेंडा दाखवला. यावेळी मालेगावचे महापौर रशीद शेख, माजी आमदार मौलाना महम्मद मुफ्ती इस्माईल, आमदार आसिफ शेख, आशियाई क्रिडा स्पर्धा सुवर्णपदक विजेत्या संजीवनी जाधव, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे,

अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, नागपुर शहर पोलीस उपआयुक्त गजानन राजमाने, सहा.पोलीस अधीक्षक मनमाड विभाग आर. रागसुधा, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, शशिकांत शिंदे, तहसिलदार ज्योती देवरे, मालेगाव मनपा उपआयुक्‍त नितीन कापडनीस यांचेसह ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मॅरेथॉनसाठी महाविद्यालयातील विद्यार्थी, पोलीस व प्रशासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, सर्वसामान्य नागरीक,
राजकिय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते समाजसेवक तसेच सर्व जाती-धर्मियांनी एकत्र येवुन भरघोस प्रतिसाद दिला.

अबालवृध्दांनीही सदर मॅरेथॉनमध्ये धावत राश्ट्रीय एकतेचा संदेष दिला. सदर मॅरेथॉनमध्ये 03 किमी, 05 किमी व 10 किमी अंतराची दौड आयोजित करण्यात आली, दरम्यान मालेगावकरांसह जिल्हयातील सुमारे 10 हजार नागरीकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदविला. मालेगाव शहरातील पोलीस कवायत मैदान, एकत्मता चौक परिसरातून मॅरेथॉनला सुरुवात झाली होती.

यावेळी ‘‘रन फॉर युनिटी, पीस अ‍ॅण्ड सेफ्टी, चला आपण सर्व धावुया’’ असा संदेश ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडून देण्यात आला. मॅरेथॉनमध्ये सहभागी स्पर्धकांना मान्यवरांचे हस्ते मेडल व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

विविध वयोगटातील एकुण 45 विजेते स्पर्धकांना मेडल, ट्रॉफी व प्रमाणपत्र देवुन गौरविण्यात आले. कार्यक्रम प्रसंगी ढोल ताशा, लेझिम पथक तसेच सांस्कृतीक तसेच पारंपारिक नृत्य पथकांनी सहभाग नोंदवित आनंद व्दिगुणीत केला.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!