Video : मालेगाव येथे टायर गोदामासह गॅरेज जळून खाक; लाखो रुपयांचे नुकसान

0

मालेगाव | प्रतिनिधी

मालेगाव शहरालगत मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल शालीमार समोर अचानक लागलेल्या आगीत टायर दुकान आणि एक गॅरेज जळून  खाक झाले. आगीची माहिती मिळताच मालेगाव मनपाच्या तीन बंबांनी जवळपास सहा खेपा करत आग आटोक्यात आणली.  या घटनेत एकूण आठ लाखांचे नुकसान झाले आहे.

प्रतिनिधीकडून मिळालेल्या माहितीनुसार मुंबई आग्रा रस्त्यालगत सुमनबाई खैरनार यांच्या शेतातील गहू कंपनीचे काम सुरु होते. गहू कापून झाल्यावर सुमनबाई यांनी शेतातील अर्धवट गव्हाच्या काड्या जाळल्या.

दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहरात कडक ऊन होते. अशातच वारा वाहू लागल्यामुळे आगीच्या ठिणग्या ठिकठिकाणी पसरू लागल्या.

काही कळण्याच्या आत आगीने रौद्ररूप धारण केले. शेतालगतच शेख खलील यांचे जुगनू टायरचे गोदाम आहे. या गोदामातही आगीने शिरकाव केला. टायर जळू लागल्यामुळे परिसरात आगीचे लोळ पसरले होते.

जुगनू टायरच्या दुकानाजवळच मोहम्मद अमीन यांचे ताज मोटार गॅरेज होते. हेदेखील आगीत खाक झाले. आगीची माहिती मिळताच मालेगाव मनपाचे तीन बंब घटनास्थळी दाखल झाले. तीनही बंबांनी जवळपास सहा खेपा केल्या. म्हणजे जवळपास १८ बंब पाणी आग विझवण्यासाठी लागले. दोन ते अडीच तासांच्या अथक प्रयत्नाअंती आग आटोक्यात आली.

LEAVE A REPLY

*