Thursday, April 25, 2024
Homeनाशिकमालेगाव : स्वच्छता कामगारांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद; ओळखपत्र दाखवूनही मारहाण केल्याचा आरोप

मालेगाव : स्वच्छता कामगारांना पोलिसांकडून लाठीचा प्रसाद; ओळखपत्र दाखवूनही मारहाण केल्याचा आरोप

मालेगाव | प्रतिनिधी 

लॉकडाऊनमध्ये रस्त्यांवर सुरक्षित अंतर न पाळणाऱ्या नागरिकांवर न राखत फिरणाऱ्या नागरिकांवर पोलिसांतर्फे कारवाई होत नसल्याची ओरड एकीकडे केली जात असली तरी दुसरीकडे शहरात कचरा उचलणाऱ्या महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागातील सेवक ओळखपत्र दाखविले तरी पोलीस दंडुके यांनी मारहाण करीत असल्याची तक्रार करत आहेत. ही मारहाण मनपा प्रशासनाने त्वरित न थांबविल्यास काम बंद आंदोलन छेडण्याचा इशारा घंटागाडी वरील सेवकांनी दिला आहे

- Advertisement -

शहरात लाँक डाउन – संचारबंदी सुरू करण्यात आल्याने मनपा प्रशासनातर्फे अत्यावश्यक सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मात्र, मनपा स्वच्छता विभागाच्या सेवकांना बंदोबस्तावरील पोलिसांतर्फे मारहाणीच्या घटना होत असल्याच्या या सेवकानं तर्फे तक्रारी केल्या जात आहेत.

आज गिरणा पुलाला मोतीबाग नाका भागात घंटागाडी वरील कामगारांना पोलिसांतर्फे मारहाणीचा प्रकार घडला घंटागाडी वरील कामगारांनी ओळखपत्र दाखविले असतानादेखील पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष करीत काठ्यांनी मारहाण केली. या प्रकाराने स्वच्छता सेवकांमध्ये असंतोष पसरला आहे. पोलिसांतर्फे सातत्याने होणारे मारहाणीचे प्रकार न थांबल्यास काम बंद आंदोलन हाती घ्यावे लागेल असा इशारा या कामगारांनी दिला आहे.

स्वच्छता विभागातील सेवकांना पोलिसांतर्फे मारहाणीचे प्रकार घडत आहे. आज देखील गिरणा पुलालगत घंटागाडी वरील सेवकांना त्यांनी ओळख पत्र दाखविले असताना देखील पोलिसांनी मारहाण केल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. या घटनेने कामगारांमध्ये असंतोष पसरला आहे. मनपा कामगारांना होत असलेल्या मारहाणी संदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख आरती सिंग तसेच अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना पत्र देण्यात येऊन सेवकांना पोलिसांतर्फे मारहाण होऊ नये यासंदर्भात आदेश देण्याची मागणी केली आहे अशी माहिती आयुक्त किशोर बोर्डे व उपायुक्त नितीन कापडणीस यांनी दिली

तक्रारींची दखल घेऊ – घुगे

करोना विषाणूचा उद्रेक रोखण्यास पोलिस मनपा आरोग्य व महसूल आदी विभाग समन्वय राखत काम करीत आहेत. अत्यावश्यक सुविधेसाठी नियंत्रण कक्षात कक्ष उभारण्यात आला आहे. याठिकाणी तक्रारींचे निवारण देखील केले जात आहे. सर्व विभागांच्या सेवकांची यादी या ठिकाणी आहे.

त्यामुळे कुणाचा पोलिसांनी अडविल्यास त्वरित या नियंत्रण कक्षाशी फोनवरून संपर्क साधावा यादीत नाव असल्यास त्वरित सोडले जाईल. अत्यावश्यक व आपत्ती व्यवस्थापन सेवेतील कर्मचाऱ्यांना अडवू नये असे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले आहे. आपल्याकडे येत असलेल्या सर्व तक्रारींची दखल घेतली जात असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दैनिक ‘देशदूत’शी बोलताना सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या