Wednesday, April 24, 2024
Homeनाशिकजवाई! रडू नका…चांगला व्हई जाशात; आम्ही शेतस ना! ‘बारा बलुतेदार’कडून रुग्णांना धीर

जवाई! रडू नका…चांगला व्हई जाशात; आम्ही शेतस ना! ‘बारा बलुतेदार’कडून रुग्णांना धीर

मालेगाव । प्रतिनिधी

सुविधा व चांगले उपचार मिळत नसल्याने हाल होत आहे, अशी करोनासह विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या रूग्णांनी केलेल्या तक्रारींची दखल घेत बारा बलुतेदार मित्र मंडळातर्फे स्वतंत्र उपचार कक्षाची सोय करत या रूग्णांना तेथे दाखल करत दिलासा देण्यात आला आहे.

- Advertisement -

नाशिक जिल्ह्यातील कसमादे पट्ट्यात अहिराणी भाषा बोलली जाते. या परिसरात आपल्या आडनावावरून एकमेकांचे नाते लावून प्रेमाने बोलले जाते. अशाच अगदी आपुलीच्या शब्दांत बाधित रुग्णांना धीर देत बंडूकाका बच्छाव यांनी या रुग्णांना दिलासा देत संकटाला सामोरे जाण्याची शक्ती दिली.

शहरालगत असलेल्या म्हाळदे घरकुल योजनेतील तयार सदनिकांमध्ये करोनाबाधीत रूग्णांना ठेवण्यात येवून त्यांच्यावर तेथेच उपचार केले जात आहेत. मात्र या इमारतींमध्ये सर्वत्र अस्वच्छतेचे पसरलेले साम्राज्य व डॉक्टर ऐवजी परिचारिका करत असलेले उपचार व मिळत असलेले नित्कृष्ट जेवण याबाबत शहरातील बाधीत व्यापार्‍यांसह नागरीकांनी व्हीडीओ व्हायरल करत आपली व्यथा मांडली होती.

मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार असा त्रास देखील या रूग्णांना आहे. चांगली उपचाराची सोय नसल्यामुळे या रूग्णांनी बारा बलुतेदार मित्रमंडळाचे संस्थापक बंडुकाका बच्छाव व अध्यक्ष कमलाकर पवार यांना विनंती करत या सेंटरमधून हलविण्याची मागणी केली होती.

या विनंतीची दखल घेत बच्छाव यांनी राजीव गांधी स्कुललगत असलेल्या एका बंगल्यात या सर्व बाधीत रूग्णांची राहण्याची सोय केली असून तेथे उपचारासाठी डॉक्टर देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आज रूग्णवाहिकेतून तक्रार करणार्‍या या बाधीत रूग्णांना या बंगल्यात हलविण्यात आले. मंडळाने आमचे जीव वाचविण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल या बाधीत रूग्णांनी कृतज्ञता व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या