Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

आगामी विधानसभा निवडणूकीसाठी संवेदनशील मतदान केंद्रांचा अहवाल सादर करा

Share

नाशिक | प्रतिनिधी  

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने जिल्हयातील संवदेनशील मतदान केंद्राबाबत उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी पोलीस अधिकारी यांच्या समवेत आज बैठक घेतली.

सदर बैठकीत निवडणूक शाखेमार्फत नियुक्त केलेले क्षेत्रिय अधिकारी व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किंवा पोलीस उपनिरीक्षक यांनी एकत्रितपणे संवेदनशील मतदान केंद्रांना भेटी देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घ्यावा व त्याचा अहवाल दिनांक 20 जूलै 2019 पर्यंत सादर करण्याच्या सूचना श्री.आनंदकर यांनी यावेळी दिल्या.

नुकत्याच झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीमध्ये ज्या मतदान केंद्रांवर कायदा व सुव्यवस्थे बाबत काही प्रश्न निर्माण झाला असल्यास, तसेच ज्या मतदान केंद्रावर नव्वद टक्केपेक्षा जास्त मतदान झालेले असल्यास अशा सर्व मतदान केंद्रांची माहिती एकत्रित करुन त्याचे विश्लेषण करण्याचे निर्देश यावेळी बैठकीत देण्यात आले.

आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततामय व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी आवश्य सर्व उपाययोजना हाती घेण्याच्या सूचना बैठकीत देण्यात आल्या.

सहायक पोलीस आयुक्त, उपविभागीय अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी आणि तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचेशी समन्वय साधून संवेदनशील मतदान केंद्रांची यादी निश्चित करण्याचे आदेश देण्यात आले.

तसेच संपूर्ण कार्यवाही कुठल्याही परिस्थितीत दिनांक-२० जुलै २०१९ पूर्वी अंतिम करावी,असे निर्देश उपजिल्हाधिकारी श्री-अरुण आनंदकर यांनी दिले.

यावेळी निवडणूक विभागाचे तहसिलदार प्रशांत पाटील, पोलीस निरीक्षक एन.आर.गायकवाड, आर. एफ. पगारे, विशेष शाखा पोलीस निरीक्षक एम. जी. बागुल, जी. एस. शिंदे आदी उपस्थित होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!