मकर पर्वातील स्नानासाठी रामकुंडावर गर्दी

0

नाशिक, ता १४ : मकर संक्रांतीच्या पर्वाला आज सर्वत्र उत्साह असून गोदाघाटावरील रामकुंड परिसरात आज हजारो भाविकांनी स्नानासाठी गर्दी केली आहे.

संक्रांतील सूर्याचे संक्रमण होऊन तो मकर राशीत प्रवेश करतो. या दिवसाला श्रद्धेच्या दृष्टीने मोठे महत्त्व असून रामकुंडावर या दिवशी स्नान करणे शुभ असल्याचे भाविकांची श्रद्धा आहे.

त्यामुळे आज पहाटेपासूनच नाशिक शहरासह बाहेरच्या राज्यातून आलेल्या महिला पुरूषांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

अनेकांनी आज गोदेची यथासांग पुजाही केली. सकाळी या ठिकाणी मोठी गर्दी झाल्याने परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

रामकुंड परिसरात वाहनांना बंदी करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

*