इंदिरानगरला फर्निचर दुकानास भीषण आग

0
नाशिक | इंदिरा नगर परिसरातील हार्डवेअर आणि फर्निचर दुकानास अचानक लागलेल्या आगीत दुकान जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

वडाळा पाथर्डी रस्त्यावरील एल आय सी कॉलनी समोरच्या यमुना ट्रेडर्स या दुकानास शोर्ट सर्किटने रात्री आठ वाजेच्या सुमारास आग लागली.

दुकानातील रंग, प्लायवूड तसेच शेजारील यमुना फर्निचर दुकानानेही पेट घेतल्याने आगीची तीव्रता वाढली.

दिवाळीमुळे दुकानात मालाची मोठी साठवणूक करण्यात आली होती. तसेच या दुकानाच्या मागे सोडा विक्रीचे दुकानदेखील होते त्यामुळे परिसरात प्लास्टिक सामान होते म्हणून आगीने रौद्ररूप धारण केले होते.

आगीची माहिती अग्निशमन विभागास मिळताच आगीचे बंब रवाना करण्यात आले. युद्धपातळीवर आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती प्रतिनिधीकडून प्राप्त झाली आहे.

LEAVE A REPLY

*