Type to search

Breaking News Featured धुळे मुख्य बातम्या

दोंडाईचा – निमगुळ रस्त्यावर बसला अपघात; १३ ठार, २० जखमी

Share

दोंडाईचा | प्रतिनिधी 

दोंडाईचा – निमगुळ रस्त्यावर रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास औरंगाबाद – शहादा बस आणि कंटेनर यांची धडक झाली. अपघातात  बसचालक मुकेश पाटील यांच्यासह १३ जण जागीच ठार झाले आहेत़.  तर २० जखमी असून पैकी ६ गंभीर आहेत़ अपघातात कंटेनरने चालकच्या साईडने बसला जोरदार धडक दिली. त्यात बसचा चक्काचूर झाला.

शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचा ते निमगुळ रस्त्यावर औरंगाबादकडून शहादाकडे जाणारी एमएच २० बीएल ३७५६ क्रमांकाची बस आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला़. अपघाताची ही घटना रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास निमगुळपासून साधारण ३ किमी अंतरावर घडली़.

अपघाताताची माहिती मिळताच जखमींच्या मदतीसाठी निमगुळ ग्रामस्थांनी धाव घेतली़ शहादा आगाराचे बसचालक मुकेश पाटील हे जागीच ठार झाले आहेत़.

बसमधील जखमी झालेल्या २० प्रवासींना मदत करीत रुग्णवाहिकेने दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्याचे काम वेगाने सुरु आहे़ या अपघातात ६ जणांची प्रकृती गंभीर आहे़त.  डॉ़ सचिन पारख आणि डॉ़ ललित चंद्रे जखमींवर उपचार करीत आहेत़.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!