नांदूरशिंगोटे बायपासजवळ ट्रक व मोटारसायकल अपघात; एक ठार

0
नांदूरशिंगोटे : नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गावर सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटेबायपासजवळ गुरुवारी दिनांक 16 रोजी दुपारी अडीचवाजेच्या सुमारास  ट्रक व मोटारसायकल यांच्यात अपघात होवून दोडी बुद्रुक येथील दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येशील भिमा भगवान आव्हाड( वय62) हे  बजाज स्पेलंडर मोटारसायकल क्रमांक एम एच 15 सी 3247 ने नांदूरशिंगोटे गावाकडे येत असतांना गावाजवळील बाह्य वळणावर सिन्नर बाजूने पाठीमागून येणारी मालट्रक क्रमांक एम एच 17 टी 2355 हीने दुचाकीस धडक दिल्याचे समजते.

जोरदार धडकीत दुचाकीस्वार भिमा आव्हाड यांचा जागीच मृत्यू झाला.अपघात इतका भयानक होता की चेहऱ्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता. वावी पोलिसांनी मालट्रक चालकाविरूध्द मोटार अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. दोडी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानतंर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक रणजित आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार पी.के.अंढागळे करीत आहे.

नाशिक – पुणे राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण गेल्या काही महिन्यांपूर्वी पुर्ण झाले आहे.परंतु काही ठिकाणी रस्त्यांची कामे अपुर्ण असल्याचे समजते. नांदूरशिंगोटे गावाबाहेरून बाह्य वळण रस्ता गेलेला आहे. येथील बाह्यवळण रस्ता जेथे गावात प्रवेश करतो त्या ठिकाणी चौफुलीचे काम बाकी आहे. त्यामुळे नांदूरशिंगोटे गावात येतांना व जातांना मोठी अडचण आहे.

नाशिक व पुणे या दोन्ही बाजूंनी वाहने वेगात असतात त्यामुळे चालकांना अंदाज येत नसल्यामुळे बायपास रस्त्यावर नेहमीच अपघात होवू लागले आहेत.अनेक जणांना अपघात प्राण गमवावे लागले आहे .आज दुपारी झालेल्या अपघातानतंर परिसरातील नागरिकांच्या तीव्र रोष व्यक्त केला आहे. सदर ठिकाणी तातडीने गतीरोधक बसविण्यात यावे अशी मागणी निवेदनात केली आहे.

अपघात झाल्यानतंर वावी पोलिस ठाण्याचे पोलीस उप निरीक्षक रणजित आंधळे यांनी घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी वावी पोलिस स्टेशन व राष्ट्रीय महामार्गावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य निलेश केदार, नांदूरशिंगोटेचे सरपंच गोपाळ शेळके, बाळासाहेब आव्हाड,संजय आव्हाड, संघर्ष गृपचे अध्यक्ष संदीप शेळके, अरूण शेळके व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*