तोरंगण घाटात खासगी बसला भीषण अपघात; १ महिला ठार, २१ जखमी

0
त्र्यंबकेश्वर (देवयानी ढोन्नर) त्र्यंबकेश्वर जव्हार रस्त्यावर जव्हारजवळ तोरंगण घाट परिसरात खासगी प्रवाश्यांच्या बसला भीषण अपघात झाला. या अपघातात २१ प्रवाशी जखमी झाले असून एका महिला भाविकाचा मृत्यू झाला आहे. जखमींमध्ये काही प्रवाशांची प्रकृती बिकट असल्याची माहिती मिळाली आहे.

आज सकाळच्या सुमारास राजस्थान येथील पर्यटक शनीशिंगणापूर, शिर्डी व त्र्यंबकेश्वर येथील दर्शन घेऊन परतत असतांना तोरंगण घाटात वळणाचा अंदाज न आल्याने चालकाचा ताबा  सुटून हा अपघात घडला.

अपघातातील बस राजस्थान येथील असून प्रवाशांना घेऊन जव्हार, चारोटी मार्गे वापी रस्त्याने राजस्थानकडे मार्गक्रमण करत होती. बस रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाला आदळली त्यामुळे मोठी हानी झाली नाही. नाहीतर शेजारी असणाऱ्या खोल दरीत बस कोसळून मोठी हानी झाली असती.

अपघाताची माहिती मिळताच मोखाडा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या रुग्णालयात दाखल केले. या अपघातात २१ प्रवाशी जखमी झाले असून सरस्वती निमा नामक महिलेचा मृत्यू झाला आहे.

LEAVE A REPLY

*